शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

बीआरटी रस्ता बनलाय मद्यपींचा अड्डा

By admin | Updated: June 24, 2016 01:49 IST

शहरातील वाढते गुन्हेगारी, दिवसाआड खुनाचे प्रकार, महिलांची छेडछाड, वाहनांची तोडफोड यांसह अनेक प्रकारच्या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यास पोलीस यंत्रणा हतबल झाली की काय

रहाटणी : शहरातील वाढते गुन्हेगारी, दिवसाआड खुनाचे प्रकार, महिलांची छेडछाड, वाहनांची तोडफोड यांसह अनेक प्रकारच्या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यास पोलीस यंत्रणा हतबल झाली की काय, असा प्रश्न नागरिकांना सातत्याने सतावत आहे. मात्र, असे प्रकार दिवसेंदिवस घडत असताना मात्र पोलीस प्रशासन मूग गिळून गप्प नसल्याचेच दिसून येत आहे. अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी देऊनही वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीत भर रस्त्यावर दारू पिण्याचे धाडस मद्यपी करताना दिसून येत आहे. त्यामुळे रस्त्याने ये-जा करणारे नागरिक, परिसरातील रहिवासी कमालीचे वैतागले आहेत. या ठिकाणी महिलांना छेडछाडीचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये एक प्रकारचे भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे या प्रकारात पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.वाकड पोलीस स्टेशन अपवाद ठरले आहे. थेरगाव येथील धनगरबाबा मंदिरासमोर दारूचे दुकान आहे. शेजारीच आनंद पार्क हौसिंग सोसायटी आहे. या सोसायटीत हजारो नागरिक वास्तव्यास आहेत. तरीही अनेक मद्यपी त्या ठिकाणाहून दारूची बादली, पाणी ग्लास घेऊन फुटपाथवर जागा मिळाले. मद्यपी घोळक्या-घोळक्याने बसलेले निदर्शनास पडत आहे. त्यामुळे अनेक वेळा महिलांची छेडछाड काढण्याचे प्रकारही होत आहेत. एखाद्या महिलेला पाहून अश्लील भाषेत संभाषण करणे, तसेच आपापसात बाचाबाचीचे प्रकार घडत आहेत, तर काही वेळा भांडणे होत आहेत. त्यामुळे या रस्त्याने ये-जा करताना ज्येष्ठ नागरिकांना, महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या हातगाड्यांवरसुद्धा दारू पिली जाते. त्या हातगाड्यांवर मोठ्या प्रमाणात घोळका जमा झालेला असतो. अनेक वेळा या हातगाड्यांवर भांडणाचे प्रकार झालेले आहेत. सायंकाळी ७ ते रात्री ११च्या दरम्यान सुरू असतो. सायंकाळी अगदी वर्दळीच्या वेळी हा प्रकार सुरू असल्याने परिसरातील रहिवासी हैराण झाले आहेत. (वार्ताहर)