आईला शिवीगाळ का करतोस विचारणाऱ्या बहिणीवर भावाचे कोयत्याने वार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 19:27 IST2019-03-05T19:10:15+5:302019-03-05T19:27:51+5:30
आईला शिवीगाळ का करतोस असा जाब विचारणाऱ्या बहिणीवर भावानेच कोयत्याने वार केला. तर दुसऱ्या बहिणीला शिवीगाळ केली. ही घटना सोमवारी निगडी ओटास्किम येथे घडली.

आईला शिवीगाळ का करतोस विचारणाऱ्या बहिणीवर भावाचे कोयत्याने वार
पिंपरी : आईला शिवीगाळ का करतोस असा जाब विचारणाऱ्या बहिणीवर भावानेच कोयत्याने वार केला. तर दुसऱ्या बहिणीला शिवीगाळ केली. ही घटना सोमवारी निगडी ओटास्किम येथे घडली.
दिलदार उर्फ नसरुद्दीन शबू खान (वय २६, रा. दळवीनगर, इमारत क्रमांक ई-१, ओटास्किम, निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी करिष्मा शब्बु खान (वय २१) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोमवारी दुपारी चारच्या सुमारास करिष्मा खान तसेच त्यांची आई शमा, बहिण निशा आणि भाऊ नसरुद्दीन शबू खान हे घरामध्ये बसले होते.
त्यावेळी आरोपी नसरुद्दीन खान आईला शिवीगाळ करीत होता. दरम्यान, करिष्मा खान या त्यांचा भाऊ नसरुद्दीन याला म्हणाल्या, आईला कशाला शिवीगाळ का करतोस. असे म्हणताच आरोपीने करिष्मा खान यांना शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच लोखंडी कोयता करिष्मा यांच्या पायावर मारल्याने त्या जखमी झाल्या. यासह त्यांची बहिण निशा यांनाही शिवीगाळ केली. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.