निगडीत आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह; आत्महत्या केल्याचा प्राथमिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 19:44 IST2023-09-07T19:44:12+5:302023-09-07T19:44:49+5:30

साईनाथ नगर, निगडी येथे गुरुवारी (दि. ७) सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली....

body of an unknown woman was found in connection pune latest news | निगडीत आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह; आत्महत्या केल्याचा प्राथमिक

निगडीत आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह; आत्महत्या केल्याचा प्राथमिक

पिंपरी : विहिरीमध्ये अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला. साईनाथ नगर, निगडी येथे गुरुवारी (दि. ७) सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

निगडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रंगनाथ उंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, साईनाथ नगर येथील एका विहिरीत महिलेचा मृतदेह असल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाकडून प्राप्त झाली. त्यानुसार, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ४० ते ४५ वयोगटातील महिलेचा मृतदेह विहिरीतील पाण्यावर तरंगत असल्याचे पोलिसांना दिसून आले. महिलेची चप्पल विहिरीजवळ मिळून आली.

अग्निशमन दलाच्या जवानांनी पोलिसांच्या मदतीने महिलेचा मृतदेह बाहेर काढला. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात हलवण्यात आला. अंगावर कोणत्याही खुणा नसल्याने महिलेने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला.

Web Title: body of an unknown woman was found in connection pune latest news