शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

पिंपरी महापालिकेच्या प्रभाग समितीवर भाजपचे वर्चस्व; आमदार लांडगे व जगताप गटाची सरशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2020 20:03 IST

पिंपरी-चिंचवड महापालिका भवनात आठही प्रभाग समिती अध्यक्षांची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे.

ठळक मुद्देप्रभाग अध्यक्षपदी भोईर, लांडगे, आंगोळकर, डोळस, त्रिभुवन, ढोरे, गायकवाड बिनविरोधराष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने उमेदवार न दिल्याने भाजपचे वर्चस्व कायम

 पिंपरी : महापालिका पालिकेच्या प्रभाग समिती निवडणुकीत भाजपची सरशी झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने उमेदवार न दिल्याने आठही प्रभागात भाजपचे वर्चस्व कायम राहिले आहे. आमदार महेश लांडगे आणि लक्ष्मण जगताप गटाची सरशी झाली आहे. प्रभाग अध्यक्ष होण्यास सदस्य इच्छुक नसल्याने दोन प्रभागावर जुन्या च सदस्यांना संधी दिली आहे. 

पिंपरी-चिंचवड महापालिका भवनात आठही प्रभाग समिती अध्यक्षांची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. प्रभाग अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत सोमवारी होती. या मुदतीत केवळ भाजप नगरसेवकांनी अर्ज भरले होते. विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसने अर्ज भरले नव्हते. त्यामुळे बिनविरोध निवड होणार निश्चित होते. त्यावर शुक्रवारी शिक्कामोर्तब झाले आहे.

 महापालिकेतील मधुकर पवळे सभागृहात सकाळी साडे अकरा वाजता निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आठ प्रभाग अध्यक्षपदासाठी आठच उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपंग कल्याण विभागाच्या आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.

 ......... यांना मिळाली संधी

 आठही समित्या भाजपच्या हाती गेल्या आहेत. 'अ' प्रभाग अध्यक्षपदी शर्मिला बाबर, 'ब' सुरेश भोईर, 'क' राजेंद्र लांडगे, 'ड' सागर आंगोळकर, 'ई' विकास डोळस, 'ग' बाबा त्रिभुवन, 'ह' हर्षल ढोरे आणि 'फ' प्रभाग अध्यक्षपदी कुंदन गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली आहे. बाबर, त्रिभुवन यांना दुस-यांदा संधी मिळाली आहे.नवनिर्वाचित प्रभाग समिती अध्यक्षाचे महापौर उषा उर्फ माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, पक्षनेते नामदेव ढाके तसेच उपस्थित नगरसदस्यांनी अभिनंदन केले. .........राष्ट्रवादी काँग्रेसचे दुर्लक्ष

प्रभाग समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने उमेदवार न दिल्याने आठही प्रभागात भाजपचे वर्चस्व कायम राहिले आहे. तर काही प्रभागात उमेदवारी घेण्यास उत्सुक नसल्याने दोन जणांना पुन्हा संधी दिली आहे. आठपैकी एकाही प्रभागात दोन्ही पक्षांनी अर्ज न भरल्याने बिनविरोध निवड करण्यात आली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडElectionनिवडणूकBJPभाजपाPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना