दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू, मुंबई - बंगळुरू महामार्गावरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 19:38 IST2024-04-17T19:36:41+5:302024-04-17T19:38:11+5:30
मुंबई - बंगळुरू महामार्गावर बाणेर येथे सोमवारी (दि. १५) सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली...

दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू, मुंबई - बंगळुरू महामार्गावरील घटना
पिंपरी : दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. मुंबई - बंगळुरू महामार्गावर बाणेर येथे सोमवारी (दि. १५) सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली.
लक्ष्मीकांत बेचन विश्वकर्मा (५४, रा. थेरगाव) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. पोलिस अंमलदार अविनाश उत्तम सगर यांनी या प्रकरणी मंगळवारी (दि. १६) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मीकांत दुचाकीवरून जात असताना त्यांची दुचाकी घसरून ते गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ पांचाळ तपास करीत आहेत.