शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

भाटकरांच्या आठवणींनी हळवा झाला स्वर अन् उलगडला मैत्रीचा पदर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2019 1:13 AM

प्रसिद्ध अभिनेते रमेश भाटकर यांचे कर्करोगाच्या दीर्घ आजाराने निधन झाले. रंगभूमीवर प्रसिद्ध होण्यापूर्वी भाटकर हे पिंपरीत टाटा मोटर्स कंपनीत नोकरी करीत होते.

पिंपरी : प्रसिद्ध अभिनेते रमेश भाटकर यांचे कर्करोगाच्या दीर्घ आजाराने निधन झाले. रंगभूमीवर प्रसिद्ध होण्यापूर्वी भाटकर हे पिंपरीत टाटा मोटर्स कंपनीत नोकरी करीत होते. नोकरी करीत त्यांनी अभिनयाची आवड जोपासली आणि त्यातून एक सकस अभिनेता घडला. भाटकरांच्या अकाली जाण्याने टाटा मोटर्समधील सहकाऱ्यांचा स्वर काहीसा हळवा झाला होता.पिंपरी-चिंचवड शहरातील टाटा मोटर्स कंपनी म्हणजे शाऩ त्यामधून मोठे झालेले मान्यवर आज कला, राजकारण, समाजकारण अशा अनेक क्षेत्रांत नावलौकिक कमवित आहेत. त्यापैकी एक म्हणजेच रमेश भाटकर होत. त्यांच्या हृद्य आठवणी त्यांचे सहकारी मित्र बाबा राणे यांनी सांगितल्या. मित्राची आठवण सांगताना त्यांना सद्गदीत झाले होते.बाबा राणे हेही कलावंत. नोकरी सांभाळून त्यांनी कलेची आवड जोपासली होती. राणे म्हणाले, ‘‘टाटा मोटर्स कंपनीत असताना बॅच नंबर ५ मध्ये प्रशिक्षणार्थी कामगार म्हणून रमेश भाटकर रूजू झाले. १९७९ ते वर्ष होते. १९८० ते ८५ या कालखंडात भाटकर यांनी नोकरी केली. कंपनीतील पहिल्या दिवसापासूनच आमची ओळख झाली. म्हणतात ना मैत्रीला ओळख लागत नाही. ओळख मैत्रीत बदलली. आणि तो माझा खूप चांगला मित्र झाला. रमेश हा अत्यंत उत्साही होता. व्हर्सटाईल अ‍ॅक्टर होता. कलेबाबत त्याचे समर्पण होते. नाटक त्याचा आणि माझा श्वास. आम्ही विविध नाटकांत एकत्रितपणे काम करू लागलो. ग्रँड मास्टर, एकात्मका एकांकिका आणि अनेक नाटकात एकत्र काम केले. त्या वेळी ते पुण्यात राजेंद्रनगर येथे राहायचे. त्यानंतर कोथरूडला राहायला गेले. काम करून आम्ही नाटकाचे प्रयोग करायचो. आवड जोपासायचो. पुढे नाटक क्षेत्रात व्यावसायिक नाटके वाढायला लागली. कंपनीचे काम आणि नाटक असा काही मेळ बसेना. म्हणून १९८५ मध्ये त्याने कंपनी सोडली. त्यानंतर आमचा संवाद तुटला होता. मध्यंतरी त्यास पुरस्कार मिळाला आणि आजाराबद्दल समजले त्या वेळी मी भेटायला गेलो. त्या वेळी नाटकांचा तो सुवर्णकाळ समोर आला. आम्ही केलेल्या नाटकांचे त्यांनी काही डायलॉग बोलून दाखविले. त्याची स्वत:ची एक अनोखी शैली आहे. पाठांतरही उत्तम. उत्तम कलावंत आणि उत्तम माणूस म्हणूनही त्याची ओळख होती. चित्रपटातील नायक अचानकपणे सोडून गेल्याने पोकळी निर्माण झाली आहे.’’

टॅग्स :Ramesh Bhatkarरमेश भाटकरpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड