Pimpri-Chinchwad| महिला पोस्टमनला निगडीत मायलेकीची विनाकारण मारहाण; गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2022 12:59 IST2022-01-29T12:53:54+5:302022-01-29T12:59:55+5:30
धमकी देऊन केली महिला पोस्टमनला मारहाण..

Pimpri-Chinchwad| महिला पोस्टमनला निगडीत मायलेकीची विनाकारण मारहाण; गुन्हा दाखल
पिंपरी : पोस्टातील पत्र वाटपाचे सरकारी कर्तव्य पार पाडत असलेल्या महिलेला विनाकारण शिवीगाळ करून मारहाण केली. याप्रकरणी माय-लेकीच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. प्राधिकरण निगडी येथे शुक्रवारी (दि. २८) दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली.
याप्रकरणी एका महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला शुक्रवारी प्राधिकरण निगडी येथे पोस्टातील पत्र वाटपाचे सरकारी कर्तव्य पार पाडत होत्या. त्यावेळी काहीही कारण नसताना आरोपी मायलेकींनी संगणमत करून फिर्यादी महिलेला शिवीगाळ केली. तसेच धमकी देऊन मारहाण केली.
अंगावर धावून येऊन साथरोग नियंत्रण अधिनियमाची पायमल्ली करून आरोपींनी सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण केला,असे फिर्यादीत नमूद आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती खेडकर तपास करीत आहेत.