Beating of fathers with minor girls molestation; Crime registred on two person | विनयभंग करून अल्पवयीन मुलींसह वडिलांना मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

विनयभंग करून अल्पवयीन मुलींसह वडिलांना मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

पिंपरी : गैरवर्तन करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. त्याबाबत विचारणा केली असता अल्पवयीन मुलीच्या वडिलांना सिमेंटचा गट्टू मारून दुखापत केली. बोराटे वस्ती, मोशी येथे रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास हा प्रकार घडला.

आशिष रामचंद्र गालफाडे, प्रभू गालफाडे (पूर्ण नाव माहीत नाही, दोघेही रा. बोराटे वस्ती, मोशी), अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी ४२ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी रामचंद्र गालफाडे यांच्याकडून घर विकत घेतले होते. या कारणावरून आशिष गालफाडे यांनी फिर्यादी यांच्या १६ वर्षीय मुलीसोबत गैरवर्तन केले. तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. असे का केले, असे फिर्यादीने विचारले असता आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या दोन्ही मुलींना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. त्यावेळी फिर्यादी त्यांना समजून सांगत असताना आरोपींनी रस्त्यावर पडलेला सिमेंटचा गट्टू डोक्यात मारून फिर्यादीला दुखापत केली.

Web Title: Beating of fathers with minor girls molestation; Crime registred on two person

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.