महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण ; कारण अस्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2019 10:06 IST2019-12-22T10:04:32+5:302019-12-22T10:06:09+5:30

महावितरण कंपनीचा कर्मचारी आपल्या कर्तव्यावर असताना चारचाकी वाहनातून आलेल्या दाेघांनी त्याला मारहाण केली.

Beating employee of MSEB ; The reason is unclear | महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण ; कारण अस्पष्ट

महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण ; कारण अस्पष्ट

पिंपरी : महावितरण कंपनीचा कर्मचारी खांबाला आर्थिंग करत असताना चारचाकी वाहनातून आलेल्या दोघांनी त्यांना मारहाण केली. तसेच कर्मचा-याच्या हातातील शॉर्ट रॉड फेकून देऊन सरकारी कामात अडथळा निर्माण केला. त्यानंतर दोघांनी वाहनातून पळ काढला. पिंपळे सौदागर येथे शनिवारी (दि. 21) तीनच्या सुमारास हा प्रकार घडला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी महेश पांडुरंग भागवत (वय 35) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी भागवत महावितरण कंपनीच्या काळेवाडी शाखेच्या पिंपळे सौदागर येथील कार्यालयात तंत्रज्ञ या पदावर कार्यरत आहेत.   

फिर्यादी भागवत शनिवारी पिंपळे सौदागर येथे एका खांबाला आर्थिंग करीत होते. त्यावेळी एका चारचाकी वाहनातून दोघे आरोपी तेथे आले. त्यांनी भागवत यांच्या हातातील शॉर्ट रॉड हिसकावून फेकून दिला. तसेच त्यांना हाताने मारहाण केली. फिर्यादी भागवत खाली पडले असता दोघे आरोपी त्यांच्या अंगावर पडले. त्यानंतर आरोपी त्यांच्या चारचाकी वाहनातून पळून गेले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.
 

Web Title: Beating employee of MSEB ; The reason is unclear