जुन्या भांडणाच्या रागातून तरुणाला मारहाण; घरात घुसून पत्नीवर चाकूने वार

By नारायण बडगुजर | Updated: August 17, 2023 12:34 IST2023-08-17T12:33:57+5:302023-08-17T12:34:06+5:30

आरोपींनी चाकू व कोयता घेऊन परिसरात दशहतही माजवली

Beating a young man out of anger at an old feud; He entered the house and stabbed his wife with a knife | जुन्या भांडणाच्या रागातून तरुणाला मारहाण; घरात घुसून पत्नीवर चाकूने वार

जुन्या भांडणाच्या रागातून तरुणाला मारहाण; घरात घुसून पत्नीवर चाकूने वार

पिंपरी : जुन्या भांडणाच्या रागातून तरुणाला मारहाण केली. तसेच काेयता घेऊन दहशत माजवून घरामध्ये घुसून तरुणाच्या पत्नीवर चाकूने वार केला. इंदिरानगर झोपडपट्टी, चिंचवड येथे मंगळवारी (दि. १५) सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. 

तुकाराम चंदू पवार (वय २५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, चिंचवड) यांनी याप्रकरणी बुधवारी (दि. १६) पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. रोहित चांदणे (वय २५), शुभम चांदणे (वय २२, दोघेही रा. इंदिरानगर, झोपडपट्टी, चिंचवड) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे किराणा सामान खरेदी करण्यासाठी जात होते. त्यावेळी आरोपी तेथे आले. जुन्या भांडणाच्या रागातून आरोपींनी शिवीगाळ करून फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर फिर्यादी घरी जात असताना आरोपींनी चाकू व कोयता घेऊन परिसरात दशहत माजवली. तसेच फिर्यादीच्या घरात घुसून त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीच्या पत्नीवर चाकूने वार करून त्यांच्या हाताला दुखापत केली, असे फिर्यादीत नमूद आहे.

Web Title: Beating a young man out of anger at an old feud; He entered the house and stabbed his wife with a knife