पिंपरी : पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरुन तरुणाला शिवीगाळ करीत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पिंपरीतील अण्णासाहेब स्टेडियमजवळ गुरुवारी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास घडली. मुन्ना कांबळे (वय २१), आतिश कांबळे (वय २०), राजू (वय २०), गणेश क्षीरसागर (वय २१, सर्व रा. बि. नं. ७, विठ्ठलनगर, पिंपरी) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी शुभम राजु वाघमारे (वय १०, रा. विठ्ठलनगर, पीसीएमसी गोडावून शेजारी, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी वाघमारे हे गुरुवारी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास पिंपरीतील अण्णासाहेब मगर स्टेडिअमजवळील त्यांच्या फळविक्रीच्या स्टॉलवर होते. त्यावेळी आरोपी त्याठिकाणी आले. त्यांनी पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरुन वाघमारे यांना शिवीगाळ करत त्यांच्याकडे असलेल्या लोखंडी दांडक्यांनी व हाताने बेदम मारहाण केली. यामध्ये ते जखमी झाले. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
पूर्ववैमनस्यातून भांडणावरुन तरुणाला लाकडी दांडक्याने मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 17:31 IST