बागेत मैत्रीणीसोबत गप्पा मारताना तिघांकडून बेदम मारहाण; तरुण आयसीयुमध्ये दाखल

By रोशन मोरे | Updated: May 9, 2023 18:49 IST2023-05-09T18:49:23+5:302023-05-09T18:49:56+5:30

तरुण बागेत मैत्रीणीसोबत गप्पा मारत असताना आरोपींनी अचानक येऊन मारहाण करण्यास सुरुवात केली

Beaten by three while chatting with girlfriend in garden Young admitted to ICU | बागेत मैत्रीणीसोबत गप्पा मारताना तिघांकडून बेदम मारहाण; तरुण आयसीयुमध्ये दाखल

बागेत मैत्रीणीसोबत गप्पा मारताना तिघांकडून बेदम मारहाण; तरुण आयसीयुमध्ये दाखल

पिंपरी : मैत्रीणीसोबत उद्यानात गप्पा मारत बसलेल्या तरुणाला तिघांनी मिळून लाकडी दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयातील आयसीयुमध्ये उपचार सुरु आहे. ही घटना शुक्रवारी (दि.५) साई उद्यान, थरमॅक्स चौक, चिंचवड येथे सायंकाळी पावनेसहाच्या सुमारास घडली. या प्रकरणी निलेश गोविंद बागडे (वय २१, रा. चिखली) याने सोमवार (दि.८) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आतिश गायकवाड आणि त्याच्या दोन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हा आरोपींच्या मारहाणीत गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याने तेथे दिलेल्या जबाबानुसार फिर्यादी हा त्याच्या मैत्रीणीसोबत साई उद्यानात गप्पा मारत बसला होता. तेथे अचानक पाठीमागून आरोपी आतिश आला. त्याने लाक़़डी दांडक्याने फिर्यादीस मारहाण करण्यास सुरवात केली. त्याने आरोपीला मारहाण का करतो विचारले असता आरोपीने शिवीगाळ करत फिर्यादीच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले. तसेच आरोपीसोबत असलेल्या त्याच्या दोन साथीदारांनीही फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, असे फिर्यादीत नमूद आहे.

Web Title: Beaten by three while chatting with girlfriend in garden Young admitted to ICU