क्रूरतेचा कळस! जमिनीवर नाक घासायला लावून केली मारहाण; पिंपरीत तरुणाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 14:18 IST2022-04-19T14:17:37+5:302022-04-19T14:18:05+5:30

आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी ४ जणांवर गुन्हा दाखल

Beaten by rubbing his nose on the ground Suicide of a young man in Pimpri | क्रूरतेचा कळस! जमिनीवर नाक घासायला लावून केली मारहाण; पिंपरीत तरुणाची आत्महत्या

क्रूरतेचा कळस! जमिनीवर नाक घासायला लावून केली मारहाण; पिंपरीत तरुणाची आत्महत्या

पिंपरी : जमिनीवरती नाक घासायला लावल्याने तसेच मारहाण केली म्हणून एकाने गळफास लावून आत्महत्या केली आहे. ही घटना रविवारी ( दि. १७) डुडुळगाव येथील महापालिकेच्या शाळेपासून ते अमृतपुष्प सोसायटी, डुडुळगाव येथे घडली आहे. सचिन सोपान तळेकर ( वय २९ ) रा. डुडुळगाव ता. हवेली असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे.

मनोज दिंगबर ढोले ( वय २२) रा. डुडुळगाव यांनी या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार किरण रामदास कान्हुरकर ( वय ३४) रा. चऱ्होली, विजय दत्तात्रय तापकिर ( वय ३२ ), अमोल बाळासाहेब तापकिर ( वय ३० ) रा. चऱ्होली , अभिनव अर्जुन गायकावड, ( वय १८ ) रा. डुडुळगाव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर यातील मनोज दिंगबर ढोले, किरण रामदास कान्हुरकर, अमोल बाळासाहेब तापकिर यांना अटक करण्यात आली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांच्या नातेवाईक महिलेस महापालिकेत कामाला लागायचे होते. सचिन तळेकर याने महिलेला फोन करून एकटेच भेटायचे आहे, असे सांगितले. याचा राग मनात धरून चार आरोपींनी मारहाण केली. तेसच जमिनीवरती नाक घासायला लावले. त्यामुळे आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच फिर्यादी याना देखील आरोपींनी शिविगाळ केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Beaten by rubbing his nose on the ground Suicide of a young man in Pimpri