पिंपरीत पूर्ववैमनस्यातून तरुणावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 12:52 IST2018-06-04T12:52:59+5:302018-06-04T12:52:59+5:30

पिंपरीतील बौद्धनगर येथे रविवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी तरुणावर धारदार शस्त्राने वार केले.

attack on youth due to past quarrel at pimpri | पिंपरीत पूर्ववैमनस्यातून तरुणावर हल्ला

पिंपरीत पूर्ववैमनस्यातून तरुणावर हल्ला

ठळक मुद्देहल्ल्यातील तरुण गंभीर जखमी, पिंपरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल

पिंपरी : बौद्धनगर येथे रविवारी रात्री बाराच्या सुमारास तरुणावर शास्त्राने वार करण्यात आले, त्यात तो जखमी झाला आहे. संदीप वाल्हेकर असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. 
पूर्ववैमनस्यातून हा प्रकार झाला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीतील बौद्धनगर येथे रविवारी(दि.३जून) रात्री बाराच्या सुमारास संदीपवर अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार केले. यामध्ये संदीप गंभीर जखमी झाला आहे. त्यास रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

Web Title: attack on youth due to past quarrel at pimpri