Pimpri Chinchwad | उद्धव ठाकरे गटाचे शहराध्यक्ष सचिन भोसले यांच्यावर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 21:52 IST2023-02-22T21:49:42+5:302023-02-22T21:52:00+5:30
सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास घटना घडली...

Pimpri Chinchwad | उद्धव ठाकरे गटाचे शहराध्यक्ष सचिन भोसले यांच्यावर हल्ला
पिंपरी : पोट निवडणुकीसाठी प्रचार करत असलेल्या ठाकरे गटाचे शहराध्यक्ष सचिन भोसले यांच्यासह तिघांवर हल्ला झाला. थेरगाव येथील मंगल नगर येथे बुधवारी (दि. २२) सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास घटना घडली.
सचिन भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी स्वीकृत नगरसेवक गोरक्षनाथ पाषाणकर हे बुधवारी सायंकाळी थेरगाव येथे महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करत होते. त्यावेळी भोसले आणि त्यांचा वाहनचालक व पाषाणकर यांच्यावर अज्ञातांनी हल्ला केला. यात भोसले आणि पाषाणकर यांना दुखापत झाली. त्यामुळे त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
उद्धव ठाकरेंनी दिला धीर
हल्ला झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सचिन भोसले यांना फोन केला. भोसले यांच्या पत्नी वर्षा भोसले यांच्याशी चर्चा केली. घाबरून जाऊ नका, तब्येतीची काळजी घ्या. याप्रकरणी चौकशी करण्यासाठी मागणी करू, असे म्हणत ठाकरे यांनी धीर दिला, असे वर्षा भोसले यांनी सांगितले.