Pimpri Chinchwad: नातेवाइकाच्या १३ वर्षीय मुलीवर नराधमाकडून अत्याचार; चिखलीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2023 11:27 IST2023-09-05T11:22:52+5:302023-09-05T11:27:09+5:30

चिखली येथे रविवारी (दि. ३) रात्री एकच्या सुमारास हा प्रकार घडला...

Assault on relative's daughter by murderer; Incident in the chikhali pune crime | Pimpri Chinchwad: नातेवाइकाच्या १३ वर्षीय मुलीवर नराधमाकडून अत्याचार; चिखलीतील घटना

Pimpri Chinchwad: नातेवाइकाच्या १३ वर्षीय मुलीवर नराधमाकडून अत्याचार; चिखलीतील घटना

पिंपरी : नातेवाइकांच्या १३ वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. चिखली येथे रविवारी (दि. ३) रात्री एकच्या सुमारास हा प्रकार घडला.

देवा हनुमंत कोलूर (४२, रा. चिखली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्यासह त्याच्या पत्नीच्या विरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पीडित अल्पवयीन मुलीने या प्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन पीडिता ही देवा काेलूर याच्या नातेवाइकांची मुलगी आहे. रविवारी ती झोपेत असताना देवा कोलूर याने जबरदस्ती करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. दरम्यान, रविवारी देवा याने पुन्हा पीडित मुलीवर अत्याचार केला. त्यामुळे मुलीला त्रास झाला. तिला रुग्णालयात दाखल केले. अत्याचार झाल्याचे तिने पोलिसांना सांगितले. त्यानुसार देवा कोलूर आणि त्याच्या पत्नीच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Web Title: Assault on relative's daughter by murderer; Incident in the chikhali pune crime