रमजान ईदचा सण असल्याने केस कटिंग करून घरी निघाला; रस्ता ओलांडताना दुचाकीची धडक, तरुणाचा मृत्यू
By प्रकाश गायकर | Updated: April 12, 2024 16:37 IST2024-04-12T16:34:37+5:302024-04-12T16:37:34+5:30
मुंबई बेंगलोर रस्त्यावर गुरुद्वारा समोर संशयित आरोपीने त्याच्या ताब्यातील दुचाकी भरधाव वेगाने चालवत रस्ता ओलांडत असलेल्या कामगाराला धडक दिली.

रमजान ईदचा सण असल्याने केस कटिंग करून घरी निघाला; रस्ता ओलांडताना दुचाकीची धडक, तरुणाचा मृत्यू
पिंपरी : दुकानातील कामगार रमजान ईदसाठी घरी पायी जात असताना दुचाकी चालकाने त्याला धडक दिली. त्यामध्ये कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. ८) रात्री दहा वाजता शितळानगर मामुर्डी येथे घडली. याप्रकरणी दुकान मालक सिराज हुसेन शेख (वय ६३, रा. देहूरोड) यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दुचाकी चालक कौशल कुमार (२२, रा. पिंपरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अली एस. के. असे मयत झालेल्या कामगाराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांच्या दुकानामध्ये अली एस. हा काम करतो. रमजान ईदचा सण असल्याने केस कटिंग करून तो घरी निघाला होता. मुंबई बेंगलोर रस्त्यावर गुरुद्वारा समोर संशयित आरोपी याने त्याच्या ताब्यातील दुचाकी भरधाव वेगाने चालवत रस्ता ओलांडत असलेल्या कामगाराला धडक दिली. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला.