३१ मार्चपर्यंत हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घेण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 09:21 IST2024-12-18T09:19:46+5:302024-12-18T09:21:51+5:30

देशभरातील वाहन उत्पादक कंपन्यांना १ एप्रिल २०१९ पासून नवीन वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन/नंबर प्लेट देणे बंधनकारक केले होते.

Appeal to install high security number plates by March 31 | ३१ मार्चपर्यंत हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घेण्याचे आवाहन

३१ मार्चपर्यंत हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घेण्याचे आवाहन

पिंपरी : पिंपरी - चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) शहरातील २०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांना ३१ मार्चपर्यंत हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन/नंबर प्लेट (एचएसआरपी) बसवून घेण्याचे आवाहन केले आहे. आरटीओने मंगळवारी याबाबतचे आदेश दिले आहेत.

देशभरातील वाहन उत्पादक कंपन्यांना १ एप्रिल २०१९ पासून नवीन वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन/नंबर प्लेट देणे बंधनकारक केले होते. याबाबतचे आदेश केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने २०१८ मध्ये दिले होते. तसेच २०१९ पूर्वीच्या वाहनांना एचएसआरपी बंधनकारक करण्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार राज्य शासनाला दिले होते. या अधिकारांतर्गत दिल्लीसह अनेक राज्यांनी एसएसआरपी बंधनकारक केले आहे.

पण, महाराष्ट्र राज्यात अजूनही २०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांना एचएसआरपी बंधनकारक करण्यात आलेले नव्हते. पण, आता राज्य परिवहन विभागाने राज्यातील २०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांना ३१ मार्च पर्यंत हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावून घेणे बंधनकारक केले आहे. पिंपरी चिंचवड आरटीओसाठी खासगी एजन्सीची नियुक्ती केली आहे. या एजन्सीमार्फत पिंपरी-चिंचवड आरटीओच्या हद्दीत पुणे जिल्ह्यातील खेड, जुन्नर, मावळ आणि लोणावळा तालुक्यांत वाहनांना नंबरप्लेट लावण्यात येणार आहे.

हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यासाठी काय आहे प्रक्रिया?
महाराष्ट्र मोटार वाहन विभागाच्या https://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बुकिंग पोर्टल लिंक उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वाहनचालकांना या बुकिंग पोर्टलवर नोंदणी करुन स्लॉट बुकिंग करावे लागणार आहे. त्यानंतरच वाहनांना ही नंबरप्लेट लावून मिळणार आहे.

हाय सिक्युरिटी नंबर प्लेटचे शुल्क

वाहनाचा प्रकार - शुल्क

दुचाकी - ४५०

तीनचाकी - ५००

चारचाकी वाहने- ७४५
 

शहरातील वाहनांसाठी एका खासगी एजन्सीची नियुक्ती केली आहे. या एजन्सीमार्फत शहरातील वाहनांना हाय सिक्युरिटी नंबरप्लेट बसविण्यात येणार आहेत. नागरिकांनी ३१ मार्चपूर्वी या नंबरप्लेट बसवून घ्याव्यात. - राहुल जाधव, उपप्रादेशिक परिवहनअधिकारी

Web Title: Appeal to install high security number plates by March 31

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.