संतापजनक! 'तुला जेवायला घेऊन जातो', पिंपरीत लॉजवर नेऊन १४ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2022 18:42 IST2022-03-27T18:42:05+5:302022-03-27T18:42:19+5:30
तू आई बाबांना सांगितले तर तुला बघून घेतो, अशी धमकीही दिली

संतापजनक! 'तुला जेवायला घेऊन जातो', पिंपरीत लॉजवर नेऊन १४ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार
पिंपरी : अल्पवयीन मुलीला लॉजवर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. अजंठानगर, निगडी येथे गुरुवारी (दि. २४) दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी तरुणाला अटक केली. पीडित १४ वर्षीय मुलीने याप्रकरणी शनिवारी (दि. २६) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. युवराज साळुंखे (वय २२, रा. महात्मा फुले नगर, चिंचवड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.
२४ मार्च रोजी दुपारी अडीचच्या सुमारास आरोपी युवराज याने अल्पवयीन मुलीस कृष्णानगर, चिंचवड येथून जेवायला घेऊन जातो, असे सांगून तिला जबरदस्तीने टेम्पोत बसवून अजंठानगर, निगडी येथील लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार केले. तू आई बाबांना सांगितले तर तुला बघून घेतो, अशी धमकीही दिली. पीडित मुलीच्या कुटुंबियांना संशय आला. त्यामुळे वडिलांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारले. त्यावेळी पीडित मुलीने घडलेल्या प्रकाराबाबत सांगितले. त्यानंतर पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी तरुणाला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक किरण कणसे तपास करीत आहेत.