शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

Ajit Pawar Passed Away : स्मार्ट सिटीची विकासावर अजितदादांची मोहर 

By विश्वास मोरे | Updated: January 28, 2026 21:11 IST

सलग तीस वर्ष पिंपरी-चिंचवड शहर, राजकारणावर अधिराज्य त्यांनी गाजवले. बेस्ट सिटी, स्मार्ट सिटीच्या विकासावर, प्रकल्पावर अजितदादाची मोहोर पदोपदी दिसून येते. 

पिंपरी: 'बारामती ही माझी जन्मभूमी आणि पिंपरी-चिंचवड ही कर्मभूमी' असे मानणारे, विकासाची दृष्टी असणारे, स्पष्टवक्ते आणि अनेक कार्यकर्त्यांना आमदार, खासदार बनवणारे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार अनंतात विलीन झाले. सलग तीस वर्ष पिंपरी-चिंचवड शहर, राजकारणावर अधिराज्य त्यांनी गाजवले. बेस्ट सिटी, स्मार्ट सिटीच्या विकासावर, प्रकल्पावर अजितदादाची मोहोर पदोपदी दिसून येते. 

गाव ते महानगर विकसित होत असताना तरुण तडफदार नेते अजित पवार यांनी १९९१ मध्ये खासदारकीच्या निमित्ताने पिंपरी- चिंचवडमध्ये पाऊल ठेवलं. त्यावेळी शहर बाळसे धरत होते. सुरुवातीला काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादीच्या माध्यमातून शहरांची सूत्रे हाती घेतली. १९९२ च्या महापालिका निवडणुकीपासून तर २०२६च्या निवडणुकीपर्यंत शहरातील आदरयुक्क्त दबदबा आणि वर्चस्व कायम ठेवल्याचे दिसून येत आहे.....१९९२ च्या महापालिका निवडणुकीमध्ये त्यांच्या विचारांचे ३२ नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर १९९७ अशा दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसमधील जेष्ठ नेते प्राध्यापक रामकृष्ण मोरे यांच्याशी थेट वर्चस्ववादाची लढत झाली. त्यानंतर २००२ पासून २०१७ पर्यंत शहराच्या राजकारणावर वर्चस्व राहिले. 'विकासाचा वादा अजितदादा' हि ओळख रूढ झाली. त्यांनी सामान्य कार्यकर्त्यांना नगरसेवक, आमदार, खासदार, महापौर, स्थायी समिती सभापती, पक्षनेता बनवले आणि स्वतःचा गट प्रस्थापित केला. १९९९ ला राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती झाल्यानंतर दादागटाचे वर्चस्व शहरात राहिले. त्याचबरोबर २००९ पासूनच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये ही त्यांचा करिष्मा राहिला. मात्र, स्वतःच्या शिलेदारांनीच घात केल्याने २०१७ ला पिंपरी चिंचवडचा राष्ट्रवादीचा गड उध्वस्थ झाला....उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, पालकमंत्री म्हणून जबाबदारी पेलत असताना त्यांनी पिंपरी- चिंचवडवरील लक्ष कधीही कमी केले नाही. प्रत्येक भाषणांमध्ये 'माझी जन्मभूमी बारामती आणि कर्मभूमी पिंपरी चिंचवड' असे ते आवर्जून सांगत असत. महापालिकेत केंद्र सरकारच्या जेएनएनयुआरएमअंतर्गत बीआरटी, सांडपाणी प्रकल्प, प्रशस्त रस्ते निर्माण केले. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प आणि शहरातील आरोग्य, शिक्षण, कला, क्रीडा, साहित्य विषयक उपक्रमांना पाठबळ दिले. मूलभूत सुविधांचे सक्षमीकरण करण्याबरोबरच कला आणि साहित्य संस्कृतीला परिपाक म्हणून शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मराठी नाट्य संमेलन पिंपरी चिंचवडमध्ये झाले होते....शेवटच्या क्षणापर्यंत शल्य!बेससिटी म्हणून लौकिक मिळवणाऱ्या पिंपरी- चिंचवड शहरात विकास करूनही २०१७ ला निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचा पराभव झाला. त्यानंतर झालेल्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचे पुत्र पार्थ पवार यांचा पराभव झाला. या दोन पराभवाचे शल्य त्यांना अखेरच्या क्षणापर्यंत होतं. याबाबतची खंत ते पिंपरी चिंचवडमधील प्रत्येक सभेमध्ये बोलून दाखवत असेल. २०२६ ची महापालिका निवडणूक त्यांनी मनावर घेतली होती. महापालिकेतील प्रशासकीय राजवटीतील भ्रष्टाचार, त्याचबरोबर भाजपच्या कालखंडात झालेल्या चुकीच्या कारभारावर हल्लाबोल केला होता. राज्यात सत्तेत सहभागी असतानाही त्यांनी पिंपरी चिंचवड शहरासाठी जनतेची बाजू घेऊन भाजपवर जोरदार झोड उठवली होते. त्यामुळे महापालिकेचा यंदाचा महापालिकेचा आखाडा गाजला होता. त्यातून राष्ट्रवादीला गेले ३७ एवढे संख्याबळ मिळाले.....पिंपरी चिंचवड शहरातील प्रशस्त रस्ते, बीआरटी मार्ग, प्रशस्त रुग्णालय, उद्याने, नदी सुधार प्रकल्प, क्रीडांगणे उभारण्यासाठी योगदान दिले. येथील प्रकल्प येथील महत्वकांक्षी प्रकल्प अजितदादांच्या अस्तित्वाची कर्तृत्वाची साक्ष देतात. पिंपरी-चिंचवड शहरातील कोणत्याही विकास कामांच्या उद्घाटनासाठी आले असताना त्या प्रकल्पाचे बांधकाम आराखडा याविषयी चर्चा करत कामाची पाहणी करत आणि त्यात काही त्रुटी असेल तर जागच्या जागेवरच त्याचा सोक्षमोक्ष लावत असत. म्हणूनच विकासकामांवर त्यांची मोहर असल्याचे दिसून येते. कार्यकर्त्यांनाही विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी शहर परिसरामध्ये जनसंवाद भरून नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले होते. म्हणूनच त्यांची दादा म्हणून ओळख म्हणूनच त्यांची दादा म्हणून ओळख शहरातील नागरिकांवर आधारित झाली आहे नागरिकांच्या हृदयात अधोरेखित झाली आहे. .... दादांनी लक्ष घातल्यानंतर...  …..१९९२ एकूण जागा :  ७८काँग्रेस  - ३३अपक्ष - ३२……१९९७ एकूण जागा - ७९काँग्रेस  - ४६अपक्ष - १४…..२००२ एकूण जागा - १०५राष्ट्रवादी काँग्रेस  - ३६काँग्रेस - ३३……२००७ एकूण जागा - १०५राष्ट्रवादी काँग्रेस - ६०काँग्रेस  - १९……२०१२ एकूण जागा - १२८राष्ट्रवादी काँग्रेस - ८३काँग्रेस  - १४ …..२०१७ एकूण जागा - १२८राष्ट्रवादी काँग्रेस  - ३६…. २०२६ एकूण जागा - १२८राष्ट्रवादी काँग्रेस  - ३७

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Pawar's Legacy: Shaping Pimpri-Chinchwad's Development, Smart City Initiatives

Web Summary : Ajit Pawar, a key NCP leader, significantly shaped Pimpri-Chinchwad's development. From infrastructure to urban planning, his influence is evident in the city's transformation into a smart city. Despite political setbacks, his commitment remained steadfast, leaving a lasting impact.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBaramatiबारामतीPlane Crashविमान दुर्घटनाDeathमृत्यू