Ajit Pawar| पिंपरी-चिंचवड दौऱ्यात अजित पवारांचे मोशीत ‘लक्ष्य’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 10:50 IST2022-08-10T10:49:34+5:302022-08-10T10:50:02+5:30

मोशी परिसरात अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे रखडली...

Ajit Pawar in Moshi during Pimpri-Chinchwad tour bad road condition in moshi | Ajit Pawar| पिंपरी-चिंचवड दौऱ्यात अजित पवारांचे मोशीत ‘लक्ष्य’

Ajit Pawar| पिंपरी-चिंचवड दौऱ्यात अजित पवारांचे मोशीत ‘लक्ष्य’

मोशी : दिवसेंदिवस झपाट्याने विकसित होणाऱ्या मोशी परिसरात अनेक ठिकाणी रस्त्यांचे काम रखडलेले आहे. ही बाब स्थानिक नेत्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार पिंपरी-चिंचवड दौऱ्यादरम्यान मोशीतील लक्ष्मी चौक ते स्वराज सोसायटी या बारा मीटर रस्त्याच्या रखडलेल्या काम त्वरीत सुरु करण्याची आदेश पवार यांनी संपर्क करून संबधिंत अधिकाऱ्यांना दिले आहेत.

या रस्त्यामुळे परिसरातील विविध सोसायट्यांमधील सहा हजार सदनिकाधारकांना फायदा होणार आहे. त्यामुळे हा रस्ता महत्त्वपूर्ण असून तातडीने त्याचे काम पूर्ण व्हावे अशी मागणी स्थानिक नेत्यांनी केली. त्यावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना काम सुरू कऱण्याचे आदेश बजावले.

तसेच रखडलेल्या रस्त्यांच्या कामांसह स्ट्रॉम वॉटरलाईन, ड्रेनेज, विद्युतवाहिन्यांचे काम चांगले करा. नागरिकांना कोणताही त्रास भविष्य़ात नको. त्यानुसार दर्जेदार काम करण्यावर भर द्या, असे आदेश पवार यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Web Title: Ajit Pawar in Moshi during Pimpri-Chinchwad tour bad road condition in moshi