शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

अजित पवारांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते - रावसाहेब दानवे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2018 8:31 PM

सिंचन घोटाळ्यातील आरोपी अजित पवार आणि इतर आरोपींच्या दारात कोणत्याही क्षणी पोलीस जातील. त्यांना कोणत्याही क्षणी अटक होईल, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिला.

पिंपरी : महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या काळात सर्वांत मोठा घोटाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंचन घोटाळ्यातील आरोपी अजित पवार आणि इतर आरोपींच्या दारात कोणत्याही क्षणी पोलीस जातील. त्यांना कोणत्याही क्षणी अटक होईल, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिला.

निगडीतील भारतीय जनता पार्टीच्या अटल संकल्प संमेलनात ते बोलत होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकाँग्रेसच्या कालखंडातील सिंचन घोटाळ्यावर दानवे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी टीका केली. दानवे म्हणाले, ‘‘जाती भेदाचे आणि बुद्धीभेदाचे राजकारण केले जात आहे. भाजपाच्या विरोधात सर्वजण एकत्र आले आहेत. सिंचन घोटाळ्यात दोषी असणाऱ्या अजित पवार यांच्या दारावर कोणत्याही क्षणी पोलीस धडकून अटक केली जाऊ शकते.’’

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘सिंचनाच्या नावावर स्वतची तिजोरी आघाडी सरकारच्या नेत्यांनी भरली. आम्ही रस्ते, सिंचनाचे काम केले मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आघाडी सरकारने सिंचनाचे घोटाळे केले. चाळीस टक्के अधिक दराने निविदा काढल्या होत्या. आम्ही सिंचनाच्या निविदा काढल्या एकही निविदा वाढीव नाही.’’

टॅग्स :Raosaheb Danweरावसाहेब दानवेAjit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस