कंपनीतून सुटल्यावर दुचाकीवरून घरी जाताना ट्रकची जोरदार धडक; तरुणीचा मृत्यू, तरुण गंभीर जखमी

By प्रकाश गायकर | Updated: February 16, 2024 16:30 IST2024-02-16T16:30:01+5:302024-02-16T16:30:50+5:30

ट्रकचालकावर गुन्हा दाखल

After leaving the company he was hit by a truck while going home on a bike Young woman dies, young man seriously injured | कंपनीतून सुटल्यावर दुचाकीवरून घरी जाताना ट्रकची जोरदार धडक; तरुणीचा मृत्यू, तरुण गंभीर जखमी

कंपनीतून सुटल्यावर दुचाकीवरून घरी जाताना ट्रकची जोरदार धडक; तरुणीचा मृत्यू, तरुण गंभीर जखमी

पिंपरी : कंपनीतील काम संपून दुचाकीवरून घरी जात असताना ट्रकने धडक दिली. त्यामध्ये एका तरुणीचा मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला. ही घटना गुरूवारी (दि. १५) सायकांळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास इंद्रायणी कॅन्सर हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारासमोर आळंदी येथे घडली. 

नेहा पांडुरंग जोशी (२३, मुलूंड, मुंबई) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी महेश दत्तात्रय लोखंडे (वय ३९, रा. तळेगाव दाभाडे) यांनी आळंदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महेश लोखंडे व नेहा जोशी हे सायंकाळी साई इंजिनिअरिंग मंगल साई टेक्नॉलॉजी प्रा. लि. या कंपनीमधून काम संपवून फिर्यादीच्या राहत्या घरी जात होते. इंद्रायणी कॅन्सर रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर आल्यानंतर त्यांच्या दुचाकीला ट्रकचालकाने जोरदार धडक दिली. यामध्ये नेहा जोशी यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असलेले महेश लोखंडे जखमी झाले.

Web Title: After leaving the company he was hit by a truck while going home on a bike Young woman dies, young man seriously injured