शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

प्रशासनाने रस्त्यासाठी घरे केली भुईसपाट; रावेत-वाल्हेकरवाडीत ७४ घरांवर प्राधिकरणाचा बुलडोजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 1:19 PM

रावेत-वाल्हेकरवाडी रस्त्याच्या रुंदीकरणासाठी आवश्यक जागेचा ताबा घेण्याकरिता अडथळा ठरत असलेल्या कच्च्या आणि पक्क्या स्वरूपातील जवळपास ७४ घरांवर प्राधिकरण प्रशासनाने बुलडोजर फिरवून जागा ताब्यात घेतली.

ठळक मुद्देअडथळा ठरत असलेल्या घरांना प्राधिकरणाने ०१ जानेवारी रोजी दिल्या होत्या अंतिम नोटिसा रस्त्यासाठी जवळपास ३७ कोटी रुपये खर्च अपेक्षित, आतापर्यंत सुमारे १७ ते १८ कोटी रुपये खर्च

रावेत : रावेत-वाल्हेकरवाडी या ३४.५ मीटर अर्धवट अवस्थेतील रस्त्याच्या रुंदीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या जागेचा ताबा घेण्याकरिता अडथळा ठरत असलेल्या कच्च्या आणि पक्क्या स्वरूपातील जवळपास ७४ घरांवर प्राधिकरण प्रशासनाने बुलडोजर फिरवून जागा ताब्यात घेतली.आज (बुधवार) सकाळी ९ वाजल्यापासून वाल्हेकरवाडी रावेत मार्गावरील छत्रपती शिवाजी चौक ते ओढ्यापर्यंतची घरे पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या साह्याने प्राधिकरणाच्या अतिक्रमण विभागाने भुईसपाट केली. रस्त्याच्या रुंदीकरणाला अडथळा ठरत असलेल्या घरांना प्राधिकरणाच्या वतीने ०१ जानेवारी रोजी अंतिम नोटिसा दिल्या होत्या. प्राधिकरणाच्या वतीने अंतिम नोटिसा बजावीत घरे खाली करण्यास सांगत घरांवरती अंतिम लाल रेषांचे मार्किंग करण्यात आले. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून महापालिका आणि नवनगर विकास प्राधिकरण यांच्या वादात भूसंपादनाअभावी रावेत ते चिंचवड जुना जकात नाका या सहा पदरी मार्गावरील वाल्हेकरवाडी गावठाणापासून ते ओढ्यापर्यंतचे काम अर्धवट अवस्थेत आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी प्राधिकरणाने कंबर कसली असून त्याकरिता आवश्यक असणाऱ्या जागेचे भूसंपादन करण्यासाठी वाल्हेकरवाडी येथील सर्वे क्र. ११५ ते १२१ मधील ७४ घरांना प्राधिकरणाने खाली करण्याच्या अंतिम नोटीस दिल्या होत्या. त्या अनुषंगाने सर्वे क्र. १२० आणि १२१मधील बाधित घरांवर बुलडोझर फिरवून घरे भुईसपाट केली. या मध्ये ५ पक्की घरे आणि ६९ तात्पुरत्या स्वरूपातील पत्रा शेड व कौलारू बैठ्या घरांचा समावेश आहे. 

महापालिका-प्राधिकरण हद्द वादचिंचवड जकात नाका ते रावेत हा रस्ता वाल्हेकरवाडी मधून जात असून या रस्त्याचे काम आजही अपूर्णच आहे. हा रस्ता चिंचवड जुना जकात नाका येथून सुरवात होऊन पुढे औंधमार्गे येणारा बीआरटी रस्ता रावेत येथे मिळतो. पुण्यावरून मुंबईकडे जाणाऱ्या लोकांसाठी हा एक चांगला मधला मार्ग असून या रस्त्यामुळे प्रवाशांचा वेळ आणि पैसा दोन्हीही वाचतो. पण या रस्त्याचे काम असे अर्धवट अवस्थेत आहे. नवनगर विकास प्राधिकरणातील हद्दीतील रस्त्याच्या कामाला सुरवात होवून ३१ डिसेंबर २०१४ रोजी पूर्ण झाले आहे, तेथून पुढील रस्त्यासाठी आवश्यक असणारे भूसंपादन महापालिकेकडून न झाल्यामुळे अजूनही हा रस्ता वापरात नाही. या रस्त्याचा पूर्ण खर्च महानगरपालिका करणार होती पण काही हद्द प्राधिकरणाच्या हद्दीत येत असल्यामुळे हा रस्ता प्राधिकरणाकडे सोपविण्यात आला. या रस्त्याची पूर्ण लांबी ३.१५ किमी व रुंदी ३४.५ मी. असून प्राधिकरणाच्या हद्दीतील २.६३ किमी लांबी आणि पूल बांधून पूर्ण झाले असून महानगरपालिकेच्या हद्दीतील वाल्हेकरवाडी येथील सुमारे २०० मीटर पेक्षा जास्त जागेच्या भूसंपादनाचे काम अपूर्ण राहिले आहे. त्यामुळे  हा रस्ता खुला करण्यात आला नाही. रस्त्यासाठी जवळपास ३७ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून आतापर्यंत सुमारे १७ ते १८ कोटी रुपये खर्च झाला आहे. प्राधिकरणाच्या हद्दीतील रस्ता पूर्ण झाला असून तो वापरण्यायोग्य आहे, असेही जाहीर करण्यात आले आहे व प्राधिकरणाची जबाबदारी त्यांनी पार पडली आहे. आता महानगरपालिकेची जबाबदारी असल्यामुळे त्यांच्याकडून काम होण्याची प्रतीक्षा नागरिकांना लागून राहिली आहे.

वाहनचालक नागरिकांना नाहक त्रासहा महानगरपालिकेच्या हद्दीतील रस्ता राहिल्यामुळे वाहनचालकांना व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विकास आराखड्यानुसार रावेत ते चिंचवड जकात नाका मार्गावरील वाल्हेकरवाडी गावठाण ते नाल्यापर्यंतचा भाग नवनगर प्राधिकरणाच्या अखत्यारीत येतो. तेथील भूसंपादन प्राधिकरणाच्या वतीने करण्यात येणार असून महापालिका रस्त्याच्या अर्धवट अवस्थेतील काम करणार आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडravetरावेत