Pimpri Chinchwad: बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
By नारायण बडगुजर | Updated: August 28, 2023 15:22 IST2023-08-28T15:21:48+5:302023-08-28T15:22:29+5:30
बसचालकाने बस हयगयीने चालवून दुचाकीस्वार तरुणाला धडक दिली होती

Pimpri Chinchwad: बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
पिंपरी : बसच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. वाय जंक्शन चौक, पिंपळे निलख येथे शनिवारी (दि. २६) सायंकाळी पावणे सातच्या सुमारास ही घटना घडली.
अभिजित संजय किरवे (वय २९, रा. गोखलेनगर, पुणे) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार रोहित पालके यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार चंद्रकांत गुरप्पा विटकर (वय ४४, रा. लोहगाव, पुणे. मूळ रा. कर्नाटक) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजित किरवे हे त्यांच्या दुचाकीवरून रक्षक चौकातून वाय जंक्शन चौकाच्या दिशेने जात होते. त्यावेळी चंद्रकांत विटकर याने त्याच्या ताब्यातील बस हयगयीने चालवून अभिजित यांच्या दुचाकीला समोरून धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या अभिजित यांचा मृत्यू झाला, असे फिर्यादीत नमूद आहे.