शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

नियमांकडे दुर्लक्ष केल्यानेच अपघात

By admin | Updated: September 27, 2016 04:32 IST

जलद वाहतुकीसाठी निगडी ते दापोडी ग्रेड सेपरेटर उभारण्यात आला. मात्र, नियमांकडे केले जाणारे दुर्लक्ष, तसेच मार्गावर वारंवार केले जाणारे बदल यांमुळे ग्रेड सेपरेटरमधील अपघातांमध्ये

पिंपरी : जलद वाहतुकीसाठी निगडी ते दापोडी ग्रेड सेपरेटर उभारण्यात आला. मात्र, नियमांकडे केले जाणारे दुर्लक्ष, तसेच मार्गावर वारंवार केले जाणारे बदल यांमुळे ग्रेड सेपरेटरमधील अपघातांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे वाहतूककोंडी काही अंशी टळली, पण अपघाताचा महामेरू झाला आहे.पिंपरी-चिंचवड शहरात प्रवेश केल्यानंतर पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांना वाहतूककोंडीचा सामना करायला लागू नये. विनासिग्नल जलद प्रवास व्हावा, यासाठी निगडी ते दापोडी हा साडेबारा किलोमीटर लांबीचा ग्रेड सेपरेटर २००८मध्ये बांधण्यात आला. यामुळे निगडीतील भक्ती-शक्ती चौकातून शहरात प्रवेश केल्यानंतर थेट पुण्यात जाणाऱ्या प्रवाशांसाठी हा मार्ग फायदेशीर ठरत आहे. अवघ्या बारा ते पंधरा मिनिटांतच निगडीहून दापोडीला पोहोचता येते. यामध्ये वाहनांचा वेगही अधिक असतो. मात्र, विविध ठिकाणी पडलेले खड्डे, ठिकठिकाणी सांडणारे आॅइल, उखडलेला रस्ता यांमुळे वाहनचालकांचे नियंत्रण सुटते. दरम्यान, अचानक ब्रेक दाबल्यास वेगातील मागील वाहने एकमेकांवर धडकण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. तांत्रिक दोषांसह मानवी दोषांमुळे हा मार्ग धोकादायक बनू लागला आहे. वाहनांची वेगमर्यादा पाळली जात नसून, भरधाव वेगात वाहने धावत असतात. यामुळे अपघातांच्या घटनांमध्ये भरच पडत आहे. पुण्याकडून निगडीच्या दिशेने येताना दापोडी येथील हॅरिस ब्रीज संपल्यानंतर लगेचच ग्रेड सेपरेटरला सुरुवात होते. मात्र, या ठिकाणी कसलेही सूचनाफलक लावण्यात आले नाहीत. (प्रतिनिधी)ग्रेड सेपरेटरमधील मर्ज इन, मर्ज आऊटचे बदल वाहतूक विभागाकडून मिळालेल्या सूचना, तसेच त्यांच्या सल्ल्यानुसार केले जातात. ग्रेड सेपरेटरमधील खड्डे व इतर दुरुस्तीची कामे १५ आॅक्टोबरनंतर हाती घेतली जाणार आहेत. या मार्गिकेवर वेळोवेळी केले जात असलेले बदल, तसेच इतरही सूचनांचे फलक लावले जातात. ग्रेड सेपरेटरमधील देखभाल-दुरुस्तीच्या खर्चापेक्षाही अपघाताच्या घटनांमुळे होणाऱ्या नुकसानीवर वर्षाला अधिक खर्च होतो. वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवल्यास अपघाताच्या घटना कमी होण्यास मदत होईल. -विजय भोजने, प्रवक्ता तथा उपअभियंता