महिलेला वाचवताना अपघात, तरुणाचा जागीच मृत्यू; पिंपरी-चिंचवडमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 10:25 IST2023-04-11T10:25:06+5:302023-04-11T10:25:28+5:30

पिंपरी : कोकणे चौकातून नाशिककडे दुचाकीवरून वेगाने जाताना रस्त्यावर आलेल्या महिलेला वाचविण्याच्या प्रयत्नात दुचाकी बीआरटीच्या ग्रिलला धडकून झालेल्या अपघातात ...

Accident while rescuing woman, youth dies on the spot; Incidents in Pimpri-Chinchwad | महिलेला वाचवताना अपघात, तरुणाचा जागीच मृत्यू; पिंपरी-चिंचवडमधील घटना

महिलेला वाचवताना अपघात, तरुणाचा जागीच मृत्यू; पिंपरी-चिंचवडमधील घटना

पिंपरी : कोकणे चौकातून नाशिककडे दुचाकीवरून वेगाने जाताना रस्त्यावर आलेल्या महिलेला वाचविण्याच्या प्रयत्नात दुचाकी बीआरटीच्या ग्रिलला धडकून झालेल्या अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू झाला. मृत्यू झालेलेल्या दुचाकी चालकाचे नाव विशाल संजय चव्हाण (वय २४, रा. गणेशनगर, दुर्गा कॉलनी, वाकड) असे आहे. ही घटना २४ मार्चला सायंकाळी सहाच्या सुमारास काटे पाटील बस स्टॉपजवळ कोकणे चौक ते नाशिकफाटा बीआरटी मार्गात घडली. याप्रकरणी रविवारी (दि. ९) सांगवी पोलिस ठाण्यात पोलिस हवालदार सुनील शहाजी जाधव यांनी फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीआरटी मार्गातून दुचाकीला बंदी असतानाही विशाल याने वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करत वेगाने दुचाकी नेली. महिला रस्त्यावर आली असता तिला वाचविण्याच्या प्रयत्नात विशाल याची दुचाकी बीआरटी मार्गाच्या कडेला असलेल्या ग्रिलला धडकली. यात गंभीर जखमी होऊन स्वत:च्या मृत्यूला कारणीभूत ठरला, असे फिर्यादीत नमूद आहे.

Web Title: Accident while rescuing woman, youth dies on the spot; Incidents in Pimpri-Chinchwad