पुणे - मुंबई एक्सप्रेसवेवर धनंजय मुंडे यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2019 15:15 IST2019-09-08T15:13:52+5:302019-09-08T15:15:46+5:30

पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर धनंजय मुंडे यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात

accident to car of dhananjay munde's covey | पुणे - मुंबई एक्सप्रेसवेवर धनंजय मुंडे यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात

पुणे - मुंबई एक्सप्रेसवेवर धनंजय मुंडे यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात

लोणावळा : पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरुन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा ताफा मुंबईच्या दिशेने जात असताना लोणावळ्याजवळील औंढे पुलाजवळ त्याच्या ताफ्यातील इंडेवर कारचा टायर निखळल्याने सदर गाडी वेगात रस्त्याच्या बाजुला पलटी झाली. या गाडीमध्ये धनंजय मुंडे यांचा एक अंगरक्षक व दोन चालक होते. सुदैवाने कोणालाही इजा झालेली नाही. आज सकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार सकाळच्या सुमारास धनंजय मुंडे यांचा ताफा मुंबईच्या दिशेने जात असताना, मळवली जवळील औंढे पुलाजवळ ताफा आलेला असताना मुंडे यांच्या गाडीच्या मागे असलेल्या इंडेवर मोटारीचे चाक निखळल्याने सदर गाडी रस्त्यावर पलटी झाली, यावेळी अन्य दोन गाड्या एकमेकाला धडकल्या मात्र या अपघातात कोणालाही इजा झालेली नाही. मोटारीचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. अपघातात धनंजय मुंडे यांचा अंगरक्षक सोपान चाटे याच्या पायाला मुका मार लागला आहे. तर चालक व्यंकट गिते व संतोष जाधव यांनाही किरकोळ मुका मार लागला आहे. मुंडे यांच्या गाडीच्या मागे असणार्‍या गाड्याचा हा अपघात झाला आहे.

Web Title: accident to car of dhananjay munde's covey