शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

लोणावळ्यात सामाजिक सलोखा राखण्याकरिता सर्वधर्मीय आरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 4:28 PM

सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित येत सण उत्सव हे धार्मिक व सामाजिक सलोखा राखत साजरे करावेत. यामधून समता व बंधुत्वाची भावना वाढीस लागण्यास हातभार लागेल या सामाजिक भावनेतून या सर्वधर्मीय आरतीचे आयोजन करण्यात आले.

ठळक मुद्देलोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात यानिमित्त सत्यनारायण महापुजा व महाप्रसादाचे आयोजन

लोणावळा : सामाजिक व धार्मिक सलोखा राखण्याकरिता लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने गणपती उत्सवाचे औचित्य साधत गुरुवारी सायंकाळी सर्व धर्मीय आरतीचे आयोजन करण्यात आले होते. लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात यानिमित्त सत्यनारायण महापुजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.  हिंदु धर्माचे संजय जाधव, मुस्लिम धर्माचे हुसेनबाबा शेख,  शिख धर्माचे सिख्खा सिंग, खिश्चन धर्माचे फादर अनिल नगरकर, जैन धर्माचे ललित सिसोदिया, रजपुत धर्माचे भुपतसिंग यांच्यासह विविध गावांचे पोलीस पाटील, सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, शांतता कमिटी व महिला दक्षता समितीचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक आदी यावेळी उपस्थित होते.लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे, लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील, ग्रामीणचे पोलीस निरीक्षक रामदास इंगवले, वडगावचे पोलीस निरीक्षक डी.एस.हाके, सहाय्यक पोलीस निरीक्षक रनावरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही आरती करण्यात आली.     सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित येत सण उत्सव हे धार्मिक व सामाजिक सलोखा राखत साजरे करावेत. यामधून समता व बंधुत्वाची भावना वाढीस लागण्यास हातभार लागेल या सामाजिक भावनेतून या सर्वधर्मीय आरतीचे आयोजन करण्यात आले असल्याचे पोलीस निरीक्षक रामदास इंगवले व उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे यांनी सांगितले.

टॅग्स :lonavalaलोणावळाPoliceपोलिसGanpati Festivalगणेशोत्सव