दारू पिण्यासाठी बोलावले होते, तू का आला नाही;मित्राला वाचवायला गेलेल्या तरुणावर कोयत्याने हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 15:58 IST2025-09-27T15:56:33+5:302025-09-27T15:58:58+5:30
पिंपरी : रिक्षातून आलेल्या सहा जणांनी मिळून एका तरुणाला शिवीगाळ करून मारहाण केली. यात भांडण सोडवायला गेलेल्या तरुणावर कोयत्याने ...

दारू पिण्यासाठी बोलावले होते, तू का आला नाही;मित्राला वाचवायला गेलेल्या तरुणावर कोयत्याने हल्ला
पिंपरी : रिक्षातून आलेल्या सहा जणांनी मिळून एका तरुणाला शिवीगाळ करून मारहाण केली. यात भांडण सोडवायला गेलेल्या तरुणावर कोयत्याने वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी (दि. २४) रात्री मोशीतील हवालदार वस्ती (वाय पॉइंट) चौक येथे घडली.
भोसरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल गणेश वाव्हळ (वय २३, मरकळ, खेड) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिवतेज ठाकरे (२४, डुडूळगाव), राहुल लोहार (२७, उरुळी कांचन), आकाश गायकवाड (२४, मोशी), ऋतिक गायकवाड (२४, चाकण), गणेश वहिले (२३, डुडूळगाव) आणि एक अनोळखी तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल, आकाश, हृतिक, गणेश यांना अटक करण्यात आली आहे.
फिर्यादी आणि त्यांचे मित्र स्वप्नील सकट (२४, डुडूळगाव) व समृद्ध कुलकर्णी हे मोटारसायकल घेण्यासाठी थांबले असताना, संशयित त्यांच्या रिक्षातून आले. शिवतेजने स्वप्नील सकट याला, ‘आम्ही पोलिसांना टीप देतो, तू असे लोकांना का सांगतो आणि दारू पिण्यासाठी बोलावले होते, तू का आला नाही,’ असे म्हणून शिवीगाळ करत मारहाण केली. फिर्यादी सोडविण्यासाठी गेले असता, संशयितांनी त्यांना लाकडी दांडक्याने मारले. संशयितांनी कोयता हवेत फिरवून दहशत निर्माण केली. संशयितांनी स्वप्नीलच्या पाठीत लाकडी दांडक्याने मारले. तसेच कोयत्याने वार केले.