Pimpri-Chinchwad Crime | रिक्षाला धक्का लागला म्हणून तरुणाला बेदम मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 11:48 IST2023-03-27T11:48:16+5:302023-03-27T11:48:57+5:30

ही घटना शुक्रवारी (दि. २४) भैरवनाथ चौक, देहूगाव येथे घडली...

A group of five to six people including the driver beat up the young man as the rickshaw was hit | Pimpri-Chinchwad Crime | रिक्षाला धक्का लागला म्हणून तरुणाला बेदम मारहाण

Pimpri-Chinchwad Crime | रिक्षाला धक्का लागला म्हणून तरुणाला बेदम मारहाण

पिंपरी : तरुणाच्या दुचाकीचा धक्का रिक्षाला लागला म्हणून रिक्षाचालकासह पाच ते सहा जणांच्या टोळक्याने तरुणाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत तरुणाच्या पोटामध्ये रक्तस्राव झाला. ही घटना शुक्रवारी (दि. २४) भैरवनाथ चौक, देहूगाव येथे घडली. याप्रकरणी कृष्णा राजाराम शिंदे (वय २२, रा. तळवडे गावठाण) यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी श्रीराम देशमुख, राम भोसले, रोहित वाघ, विष्णू वाघ, विजय सुर्वे यांच्यासह एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या दुचाकीवरून जात असताना त्यांच्या दुचाकीचा धक्का आरोपी श्रीराम देशमुख यांच्या रिक्षाला लागला. त्यामुळे आरोपी सर्व आरोपींनी मिळून फिर्यादी यांना लाथबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादी यांच्या पोटामध्ये रक्तस्राव होऊन ते गंभीर जखमी झाले आहेत, असे फिर्यादीत नमूद आहे.

Web Title: A group of five to six people including the driver beat up the young man as the rickshaw was hit