तरुणीचा प्रेमसंबंधास नकार; तरुणाची ॲसिड फेकण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2023 20:34 IST2023-08-24T20:34:12+5:302023-08-24T20:34:38+5:30

तरुणीचा विनयभंग करून शिवीगाळही केली

A girl's refusal to have an affair Youth threatens to throw acid | तरुणीचा प्रेमसंबंधास नकार; तरुणाची ॲसिड फेकण्याची धमकी

तरुणीचा प्रेमसंबंधास नकार; तरुणाची ॲसिड फेकण्याची धमकी

पिंपरी : प्रेमसंबंधास नकार दिल्याने तरुणीवर ॲसिड फेकण्याची धमकी दिली. तसेच तरुणीचा विनयभंग करून शिवीगाळ केली. दिघी येथे सोमवारी (दि. २१) हा प्रकार घडला.

पीडित तरुणीने याप्रकरणी बुधवारी (दि. २३) दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यश उर्फ करण संजय लोणारे (वय १९, रा. रहाटणी ) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यश लोणारे हा फिर्यादीचा सतत पाठलाग करत असे. फिर्यादीने त्याच्याशी लग्न करावे यासाठी त्याने फिर्यादीच्या मागे फिरून विनयभंग केला. त्याच्यासोबत प्रेम संबंध ठेवावे, अशी मागणी त्याने फिर्यादीकडे केली. त्याला फिर्यादीने नकार दिला. याचा राग येऊन त्याने तिला शिवीगाळ करून बघून घेण्याची धमकी दिली. फिर्यादीच्या घरच्यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता, त्याने फिर्यादीच्या घरच्यांना शिवीगाळ करत फिर्यादीवर ॲसिड टाकण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे.

Web Title: A girl's refusal to have an affair Youth threatens to throw acid