गणपतीला साडी नेसण्यास विरोध केल्याने १३ वर्षीय मुलीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2023 11:58 IST2023-09-22T11:54:10+5:302023-09-22T11:58:07+5:30

दत्तनगर, किवळे येथे मंगळवारी (दि. १९) दुपारी ही धक्कादायक घटना घडली...

A 13-year-old girl commits suicide after protesting against wearing a sari to Lord Ganesha | गणपतीला साडी नेसण्यास विरोध केल्याने १३ वर्षीय मुलीची आत्महत्या

गणपतीला साडी नेसण्यास विरोध केल्याने १३ वर्षीय मुलीची आत्महत्या

पिंपरी : लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी साडी नेसण्याचा हट्ट करणाऱ्या १३ वर्षीय मुलीला आईने विरोध केला. याचा राग आल्याने मुलीने ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दत्तनगर, किवळे येथे मंगळवारी (दि. १९) दुपारी ही धक्कादायक घटना घडली.

सुश्मिता पिंटू प्रधान, असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रधान कुटुंबीयांची मंगळवारी गणपतीची प्रतिष्ठापना करण्याची लगबग होती. सुश्मितासह तिची मोठी बहीण आणि लहान भाऊ असे तिघे जण सकाळपासूनच बाप्पांच्या आगमनाची तयारी करीत होते. त्यावेळी सुश्मिताने साडी नेसण्याचा हट्ट केला.

साडी नेसून नटूनथटून तिला बाप्पांचे स्वागत करायचे होते. मात्र, साडी नेसवण्यास आईने विरोध केला. त्यामुळे सुश्मिता नाराज झाली होती. त्या रागातून दुपारी सुश्मिताने बाथरूममध्ये गळफास घेतला. कुटुंबीयांनी बाथरूमचा दरवाजा तोडून सुश्मिताला खाली उतरवून रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वी सुश्मिताचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.

Web Title: A 13-year-old girl commits suicide after protesting against wearing a sari to Lord Ganesha