शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
4
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
5
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
6
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
7
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
8
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
9
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
10
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
11
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
12
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
13
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
14
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
15
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
16
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
17
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
18
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
19
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
20
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
Daily Top 2Weekly Top 5

मावळ तालुक्यात ८६.०३ टक्के मतदान

By admin | Updated: August 5, 2015 03:25 IST

मावळ तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ८६.०३ टक्के मतदान झाले. ३१६ जागांसाठी ७१९ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले

वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ८६.०३ टक्के मतदान झाले. ३१६ जागांसाठी ७१९ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. कामशेत वगळता मावळ तालुक्यात शांततेत मतदान झाले. मतदानप्रक्रिया संपल्यावर सायंकाळी तळेगाव दाभाडे येथील पु. वा. परांजपे हायस्कूल येथे निवडणूक कर्मचाऱ्यांनी इलेक्ट्रॉनिक व्होटर मशिन व इतर साहित्य जमा केले असून, गुरुवारी सकाळी ९ वा. मावळ तहसील कार्यालय, महसूल भवन येथे मतमोजणी होणार असल्याची माहिती तहसीलदार शरद पाटील यांनी दिली.मावळ तालुक्यातील ताजे , कुरवंडे , कुसगाव पमा , आढे , उर्से , करंजगाव , बऊर , साई , गहुंजे , वारु , येलघोल , शिवली , शिवणे , थुगाव , तिकोणा , अजिवली , माळेगाव बुद्रुक , नाने , वेहरगाव , सोमाटणे , दारुंब्रे , खांडशी ,शिरदे , आपटी , महागाव , कार्ला , साते , टाकवे बुद्रुक , वडेश्वर , आंबी , चिखलसे , कशाळ , नवलाख उंब्रे , डाहुली , धामणे , सांगवडे , परंदवडी , कुसगाव खुर्द , घोणशेत , उकसान , मळवंडी ठुले , कोथुर्णे , मोरवे , येळसे , पाटण , मळवली व कुसगाव बुद्रुक या ४७ ग्रामपंचायतींमध्ये शांततेत मतदान झाले. मतदारांनी दुपारी १२ पर्यंत रांग लावून मतदान केले. मतदानास युवा मतदारांचा मोठा उत्साह होता. वृद्ध व्यक्तींनी मतदानाचा हक्क बजाविला. ४७ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या ३१६ जागासाठी रिंगणात असलेल्या ७१९ उमेदवारांचे १३८ मतदान केंद्रात ८६.०३ टक्के मतदान करण्यात आले. एका मतदान केंद्रावर १ मतदान केंद्राध्यक्ष, ३ मतदान अधिकारी, १ शिपाई व १ पोलीस कर्मचारी असे ६ कर्मचारी नियुक्त केले असून, मतदान प्रक्रियेसाठी ३८ निवडणूक निर्णय अधिकारी, १८० मतदान केंद्राध्यक्ष व ५४० मतदान अधिकारी एकूण ७५८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. निवडणूक कर्मचारी, व्होटिंग मशिन व इतर साहित्याची वाहतूक करण्यासाठी ३५ वाहने नियुक्त केली होती. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या २० जीप, महाराष्ट्र शासनाच्या १३ एसटी बस व २ जीप अशी एकूण ३५ वाहने नियुक्त केली आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे मतदानप्रक्रिया संपल्यावर इलेक्ट्रॉनिक व्होटर मशीन व इतर साहित्य मंगळवारी सायंकाळी तळेगाव दाभाडे येथील पु.वा. परांजपे हायस्कुल येथे जमा करण्यात येण्यात आले. ४८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मत मोजणी गुरुवार, दि. ६ आॅगस्ट रोजी ९ :३० वा. मावळ तहसीलदार महसूल भवन येथे होणार असून, एका वेळी २० टेबल लावण्यात येणार आहे. मतमोजणीचा निकाल ऐकण्यासाठी लाउड स्पीकर लावण्यात येणार आहे. (वार्ताहर)