शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
3
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
4
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
5
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
6
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
7
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
8
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
9
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
10
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
11
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
12
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
13
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
14
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
15
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
16
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
17
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
18
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
19
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
20
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...

वाकड पोलिसांची 'धडाकेबाज' कामगिरी ; पाऊण किलो सोने आणि एक क्विंटल चांदी गुन्हेगारांकडून हस्तगत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2020 18:52 IST

वाकड पोलिसांनी तब्बल दहा दिवस त्या परिसरात तळ ठोकून गुन्हेगारांच्या टोळीचा शोध लावला.

ठळक मुद्देतीन वाहने, पिस्तुलासह एक कोटी ११ लाख ३७ हजार जप्त  ७५० ग्राम सोने, १०० किलो चांदी, तीन वाहने, १ पिस्तूल, ५ काडतुसे, कटावण्या मुद्देमाल जप्त न्यायालयाने दोघांना सुनावली १२ दिवसांची पोलीस कोठडी

पिंपरी : गंभीर गुन्ह्यांत फरार असलेल्या सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केलीे. त्यांच्याकडून पाऊण किलो सोने, एक क्विंटल चांदी, तीन कार, एक गावठी पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे असा एकूण एक कोटी ११ लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वाकडपोलिसांनी ही कामगिरी केली.

विकीसिंग जालिंदरसिंग कल्याणी (वय ३१, रा. रामटेकडी, हडपसर, पुणे), विजयसिंग अंधासिंग जुन्नी उर्फ शिकलकर (वय १९, रा. पिसवली, कल्याण) अशी अटक केलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.

पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी याबाबत माहिती दिली. २० सप्टेंबर रोजी वाकड रोड येथे पीआर ज्वेलर्स नावाचे सराफाचे दुकान फोडून तीन किलो चांदी व सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला. त्याबाबत वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्याच दिवशी निगडी येथील नवकार ज्वेलर्समधून २० किलो चांदीचे दागिने आणि २६ सप्टेंबर रोजी पिंपरी येथील दुर्गा ज्वेलर्स हे दुकान फोडून पाऊण किलो चांदीचे दागिने चोरीला गेल्याबाबत गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती.

वाकड पोलिसांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने आणि उपनिरीक्षक सिद्धनाथ बाबर यांची दोन पथके तयार करून या गुन्ह्याचा तपास सुरू केला. निगडी येथील चोरी झालेल्या सराफ दुकानापासून काही अंतरावर एक चारचाकी वाहन संशयास्पद आढळले. त्यावरून पोलिसांनी त्या वाहनाचा शोध घेतला असता लोणी काळभोर आणि लोणीकंद येथून दोन चारचाकी चोरीला गेल्याचे उघडकीस आले.

पोलिसांनी खराडी, लोणीकंद, चंदननगर, वाघोली भागात शोध मोहीम सुरू केली. त्यासाठी वाकड पोलिसांनी तब्बल दहा दिवस त्या परिसरात तळ ठोकून गुन्हेगारांच्या टोळीचा शोध लावला. सराईत गुन्हेगार विकीसिंग जालिंदरसिंग कल्याणी आणि त्याची टोळी हे गुन्हे करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. 

एका चारचाकी वाहनातून आरोपी कल्याणी फिरत आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा लावून चारचाकी वाहनासह आरोपी कल्याणी आणि त्याच्या एका साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले. चारचाकीची पाहणी केली असता कल्याणी याच्या वाहनामध्ये दोन लोखंडी कटावण्या, दोन कटर, सहा स्क्रू ड्रायव्हर, एक स्प्रे कॅन मिळाला. तर कल्याणी याच्याकडे एक गावठी पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसे मिळाली. त्याने वाकड रोडवरील पीआर ज्वेलर्स हे दुकान फोडल्याची कबुली दिली. त्यावरून दोघांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांना १२ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आरोपींकडून एक कोटी ११ लाख ३७ हजार रुपयांचे ७५० ग्राम सोने, १०० किलो चांदी, तीन वाहने, एक पिस्तूल, पाच काडतुसे, कटावण्या असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. 

वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने, पोलीस उपनिरीक्षक सिद्धनाथ बाबर, पोलीस कर्मचारी विक्रम जगदाळे, जावेद पठाण, विजय गंभीरे, विक्रम कुदळ, नितीन गेंगजे, सुरज सुतार, बापूसाहेब धुमाळ, बिभीषण कन्हेरकर, बाबाजान इनामदार, शाम बाबा, नितीन ढोरजे, दीपक भोसले, सचिन नरुटे, प्रमोद भांडवलकर, प्रमोद कदम, तात्या शिंदे, प्रशांत गिलबिले, नूतन कोंडे यांच्या पथकाने ही कामगिरी केलीे.

................

सातत्याने बदलायचे वास्तव्याचे ठिकाणकल्याणी हा दरोडा, जबरी चोरी, खून यांसारख्या ४१ गंभीर गुन्ह्यात अटक होता. तसेच त्याच्यावर आणखी १५ गंभीर गुन्हे दाखल असून तो फरार होता. पोलिसांना चकवा देण्यासाठी तो एकाच ठिकाणी जास्त दिवस वास्तव्य करीत नव्हता. सातत्याने राहण्याचे ठिकाण बदलत होता. आपण संरक्षण दलात नोकरीला आहोत, असे सांगून तो भाडेतत्वावर घर घेऊन राहात होता. तसेच तो नेहमी शस्त्र बाळगत होता. त्याने यापूर्वी पोलिसांवर देखील गोळीबार केला आहे.

...............................

विविध पोलीस ठाण्यांतील ३४ गुन्ह्यांची उकलआरोपींनी त्यांच्या आणखी दोन साथीदारांसोबत वाकड (५ गुन्हे), चिखली (५ गुन्हे), देहूरोड (३ गुन्हे), निगडी (६ गुन्हे), पिंपरी (३ गुन्हे), चिंचवड (२ गुन्हे), सांगवी (२ गुन्हे), भोसरी (२ गुन्हे), एमआयडीसी भोसरी (२ गुन्हे), हिंजवडी (१ गुन्हा), लोणी काळभोर (१ गुन्हा), लोणीकंद (१ गुन्हा), वालीव (१ गुन्हा) या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एकूण ३४ गुन्हे केल्याचे आरोपी यांनी पोलीस तपासात सांगितले. यात घरफोडीचे ३२ तर वाहनचोरीचे दोन गुन्हे आहेत.

......................

रेकी करून फोडायचे सराफ दुकानआरोपी सातत्याने रहिवासाचे ठिकाण बदलून रेकी करत असत. सराफा दुकानाची पाहणी केल्यानंतर चोरीचा गुन्हा करीत. यासाठी आरोपी कल्याणी याने त्याच्या दोन मेव्हण्यांना देखील या गुन्ह्यांमध्ये सहभागी करून घेतले. आरोपी कल्याणी याच्या वडिलांनी खून प्रकरणात तुरुंगवास भोगला आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडwakadवाकडPoliceपोलिसtheftचोरीArrestअटकGoldसोनंSilverचांदी