घरात घुसून ६० वर्षीय वृद्ध महिलेला जबरदस्तीने काढले बाहेर; ६ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 18:12 IST2021-09-03T18:12:27+5:302021-09-03T18:12:34+5:30

दरम्यान महिलेच्या हाताला घरातील जिना लागल्याने महिला जखमी झाली.

60-year-old woman forced out of house; Filed a case against 6 persons | घरात घुसून ६० वर्षीय वृद्ध महिलेला जबरदस्तीने काढले बाहेर; ६ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

घरात घुसून ६० वर्षीय वृद्ध महिलेला जबरदस्तीने काढले बाहेर; ६ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

ठळक मुद्दे महिलेच्या पतीला घरात येण्यास आरोपींनी केला मज्जाव

पिंपरी : जबरदस्तीने घरात घुसून सहा जणांनी मिळून महिलेला घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान महिलेच्या हाताला घरातील जिना लागल्याने महिला जखमी झाली. महिलेच्या पतीला घरात येण्यास आरोपींनी मज्जाव केला.

ही घटना गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता यमुनानगर, निगडी येथे घडली.शशिकांत घाटगे (वय ५०, रा. मोरवाडी, पिंपरी), गणेश आहेर (वय ३५, पत्ता माहिती नाही) आणि चार महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ६० वर्षीय महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वृद्ध महिला घरात असताना आरोपींनी त्यांच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश केला. त्यांना धक्काबुक्की करून हातानं मारहाण केली. तसेच घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान महिलेनं घरातील जिन्याला पकडले. शशिकांत घाटगेने त्यांचे दोन्ही हात मुरगळून जोरात ओढले. त्यात महिलेच्या हाताला जिना लागला आणि त्यात त्या जखमी झाल्या. शशिकांत घाटगे आणि गणेश आहेर या दोघांनी फिर्यादी यांच्या पतीला घरात येण्यास अटकाव केला.

Web Title: 60-year-old woman forced out of house; Filed a case against 6 persons