गुंतवणूक करण्यास सांगून ५७ लाखांची फसवणूक; जास्त नफ्याचे आमिष दाखवून गंडा
By नारायण बडगुजर | Updated: March 12, 2024 17:49 IST2024-03-12T17:48:18+5:302024-03-12T17:49:46+5:30
यंत्रा कंपनीमध्ये एक लाख गुंतवणूक केल्यास प्रती महिना १० हजार जास्तीचा नफा देईन असे वर्षा अखेर दोन लाख २० हजार रुपये मिळतील असे आमिष दाखवले.

गुंतवणूक करण्यास सांगून ५७ लाखांची फसवणूक; जास्त नफ्याचे आमिष दाखवून गंडा
पिंपरी : कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. गुंतवणुकीची आकर्षक योजना सांगून तिघांची ५७ लाख ७१ हजार रुपयांची फसवणूक केली. मोशी येथील यंत्रा कंपनी येथे ३० नोव्हेंबर २०२२ ते १७ एप्रिल २०२३ या कालावधीत हा प्रकार घडला.
राजेश रघुनाथ आमले (४३, रा. पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. जितेंद्र मनोहर बल्लाडकर (रा. तपकीर नगर, मोशी) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजेश व इतर गुंतवणूकदारांना संशयिताने त्याच्या यंत्रा कंपनीमध्ये एक लाख गुंतवणूक केल्यास प्रती महिना १० हजार जास्तीचा नफा देईन असे वर्षा अखेर दोन लाख २० हजार रुपये मिळतील असे आमिष दाखवले. गुंतवणुकीसाठी आकर्षक योजना सांगून विश्वास संपादन केला. त्यानुसार फिर्यादी राजेश यांनी ४३ लाख रुपये गुंतवले. त्यातील पाच लाख परत केले. मात्र ३८ लाख रुपयांची फसवणूक केली. अशाच प्रकारे फिर्यादी राजेश यांचे मित्र सचिन घोलप यांची १० लाख २१ हजार व वाजीद शेख यांची नऊ लाख ५० हजार रुपये, अशी एकूण ५७ लाख ७१ हजार रुपयांची फसवणूक केली. फिर्यादी राजेश यांच्यासारखे आणखी इतर गुंतवणूकदारांना राजेश याने अधिक नफ्याचे आमिष दाखवले. रोख व ऑनलाइन स्वरुपात गुंतवूण करण्यास सांगून गुंतवणूकदारांची लाखो रुपयांची फसवणूक केली. पोलिस उपनिरीक्षक संतोष इंगळे तपास करीत आहेत.