सात वर्षीय मुलीसोबत ५० वर्षीय व्यक्तीचे लैंगिक चाळे; पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2022 17:58 IST2022-11-05T17:44:58+5:302022-11-05T17:58:09+5:30

आरोपीला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे....

50-year-old man sexually assaults seven-year-old girl; Striking type in Pimpri-Chinchwad | सात वर्षीय मुलीसोबत ५० वर्षीय व्यक्तीचे लैंगिक चाळे; पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक प्रकार

सात वर्षीय मुलीसोबत ५० वर्षीय व्यक्तीचे लैंगिक चाळे; पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक प्रकार

पिंपरी : भाऊ आणि मैत्रिणींसोबत खेळत असलेल्या सात वर्षीय मुलीसोबत ५० वर्षीय व्यक्तीने लैंगिक चाळे केले. काळेवाडी फाटा, वाकड येथे गुरुवारी (दि. ३) दुपारी साडेबारा ते दीड वाजेच्या दरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली.

भाऊसाहेब माणिकराव गायकवाड (वय ५०, रा. थेरगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी ३८ वर्षीय महिलेने शुक्रवारी (दि. ४) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची साडेसात वर्षीय मुलगी तिच्या भाऊ आणि मैत्रिणींसोबत घराजवळ खेळत होती. यावेळी आरोपी तेथे आला. त्याने इतर मुलांना तेथून हाकलून दिले. पीडित मुलीला फरसाण खायला दिले. त्यानंतर त्याने तिला बाजूला नेत गैरवर्तन करून लैंगिक चाळे केले. फिर्यादीच्या साडेसात वर्षीय मुलाचा विनयभंग केला.

Web Title: 50-year-old man sexually assaults seven-year-old girl; Striking type in Pimpri-Chinchwad