पिंपरीतील जांबेत ५० लाखांचा गुटखा व पानमसाला जप्त; एकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 19:08 IST2020-01-15T19:07:25+5:302020-01-15T19:08:58+5:30
बेकायदेशीर विक्री करण्यासाठी गुटखा व पानमसाल्याचा साठा

पिंपरीतील जांबेत ५० लाखांचा गुटखा व पानमसाला जप्त; एकाला अटक
पिंपरी : बेकायदेशीर विक्री करण्यासाठी गुटखा व पानमसाल्याचा साठा केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. 49 लाख 75 हजार 500 रुपयांचा गुटखा व पानमसाला जप्त करण्यात आला आहे. जांबे येथे मंगळवारी (दि. 14) साडेबाराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
महेंद्रकुमार नथुलाल राठोड (वय 35, रा. थेरगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक संतोष शामराव सावंत (वय 33, रा. पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जांबे येथे मंगळवारी पत्राशेडमध्ये 49 लाख 75 हजार 500 रुपयांचा गुटखा व पानमसाला आढळून आला. त्याच्या खरेदीचे बिल किंवा माहिती आरोपी राठोड याच्याकडे नव्हती. तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आरोप राठोड याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आली आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अनिरुद्ध गिजे तपास करीत आहेत.