शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकाचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
2
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
3
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
4
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
5
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
6
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
7
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
8
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
9
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
10
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
11
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
12
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
13
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
14
VIDEO: काव्या मारनला सर्वांसमोर कुणी दिला गुलाब? SRHच्या विजयानंतर घडला किस्सा
15
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
16
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
17
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
18
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
19
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यामुळे वाचले ३५ प्रवाशांचे प्राण

By admin | Updated: October 14, 2016 05:39 IST

वल्लभनगरच्या चाणाक्ष कर्मचाऱ्यामुळे मद्यपान करून एसटी चालविण्यास बसणाऱ्या चालकास पकडले आहे़ त्यामुळे एसटीतील ३० ते ३५ प्रवाशांचा जीव

पिंपरी : वल्लभनगरच्या चाणाक्ष कर्मचाऱ्यामुळे मद्यपान करून एसटी चालविण्यास बसणाऱ्या चालकास पकडले आहे़ त्यामुळे एसटीतील ३० ते ३५ प्रवाशांचा जीव वाचल्याची चर्चा प्रवाशांमध्ये सुरू होती़ गुरुवारी सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी भुम आगारातून मुंबईला निघालेली एसटी (एमएच २० बीटी २७०६) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास स्वारगेट बसस्थानकात पोहचली़ भुम आगाराचे दोन चालक एसटीच्या प्रवासासाठी होते़ पहिल्या चालकाने गाडी स्वारगेट स्थानकात पोहचविली़ थोडा वेळ थांबल्यानंतर मुंबईच्या प्रवासाला निघण्यासाठी स्वारगेटवरून बसलेला दुसरा एसटीचालक एल़ एस़ चव्हाण याने संचेती रुग्णालयापासून पुणे - मुंबईकडे जाणाऱ्या दिशेने एसटी वळविली़ साडेचार वाजण्याच्या सुमारास पिंपरी-चिंचवड येथील वल्लभनगर आगारात एसटी दाखल झाली़ एसटीमध्ये ३० ते ३५ प्रवाशी मुंबईच्या प्रवासासाठी बसले होते़ १० मिनिटांत एसटी सुरू होऊन पुढच्या प्रवासाला निघणे अपेक्षित होते़ मात्र, चालकाने वल्लभनगरच्या आगारात गाडीची नोंद करण्यासाठी व ब्रेक सेटिंग करावयाचे असल्याने लॉगशिट डेपोत देऊन तो बाहेर निघून गेला़ साधारण अर्ध्या ते पाऊण तासाने एसटीचा चालक चव्हाण डेपोत लॉगशिट घेण्यासाठी गेला़ एसटीचा चालक खूप वेळाने आल्यामुळे वल्लभनगर आगारातील हेड मेकॅनिक एम़ बी़ नवगिरे यांना आश्चर्य वाटले़ लॉकशिट घेऊन जाताना एसटीचा चालक चालताना डुलत-डुलत चालत असल्याचे नवगिरे यांच्या लक्षात आले़ त्यांनी ही बाब त्वरित वरिष्ठांच्या कानावर घातली़ एसटीचा चालक चव्हाण एसटी सुरू करण्यासाठी जात असताना वल्लभनगरच्या कर्मचाऱ्यांनी त्यास पकडले़ त्या वेळी तो मद्यपान करून आल्याचे त्यांच्या ध्यानात आले़ वल्लभनगरच्या आगार व्यवस्थापकांनी एसटी चालकास पकडून वायसीएम रुग्णालयात तपासणीसाठी नेले़ मुंबईला निघालेल्या प्रवाशांना एक तासापेक्षा अधिक वेळ वल्लभनगरच्या आगारात थांबावे लागले़ आगार प्रमुखांनी दुसऱ्या चालकाची नेमणूक करून एसटी मुंबईच्या दिशेने घेऊन जाण्याची परवानगी दिली़ (प्रतिनिधी)