पादचाऱ्याची लुबाडणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2018 21:04 IST2018-08-12T21:01:45+5:302018-08-12T21:04:35+5:30
पायी चाललेल्या तरुणावर काेयत्याने वार करुन त्याच्याजवळील रक्कम अाणि माेबाईल लांबवला.

पादचाऱ्याची लुबाडणूक
पिंपरी : दुचाकीवरुन आलेल्या तिघा जणांच्या टोळक्याने पादचारी तरुणावर कोयत्याने वार करुन लुटले आहे. ही घटना शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास नेहरुनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडीयम जवळ घडली. कमलेश चव्हाण (वय २१, रा. संत तुकारामनगर, पिंपरी) असे लुटमार झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी त्याने पिंपरी पोलिस ठाण्यात दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात हल्लेखोरांविरोधात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास फिर्यादी चव्हाण हा चिंचवड येथील त्याच्या नातेवाईकांच्या घरी जेवण करुन नेहरुनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडीयम जवळून पायी संत तुकारामनगर येथील त्याच्या घरी जात होता. यावेळी दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी कमलेश याच्यावर कोत्याने वार करुन त्यांच्या जवळील रोख दीड हजार रुपये आणि साडेसहा हजार रुपयांचा एक मोबाईल जबरदस्तीने हिसकावून पळून गेले. पिंपरी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल बढे तपास करत आहेत.