पिंपरी पोलिसांनी जप्त केलेल्या १४ चारचाकी आगीत जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2020 19:40 IST2020-11-09T19:36:52+5:302020-11-09T19:40:04+5:30

आगीचे कारण अस्पष्ट

14 four-wheelers burnt in fire who seized by Pimpri police | पिंपरी पोलिसांनी जप्त केलेल्या १४ चारचाकी आगीत जळून खाक

पिंपरी पोलिसांनी जप्त केलेल्या १४ चारचाकी आगीत जळून खाक

पिंपरी : पोलिसांनी जप्त केलेली १४ चारचाकी वाहने जळून खाक झाली. पिंपरी पोलीस ठाण्याला लागून असलेल्या मोकळ्या जागेत सोमवारी (दि. ९) दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली.

पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र निकाळजे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी विविध गुन्ह्यात पकडलेली वाहने पिंपरी पोलीस ठाण्याजवळच्या मोकळ्या मैदानात लावलेली आहेत. कित्येक वर्षांपासून ती वाहने तेथेच पडून आहेत. सोमवारी दुपारी या वाहनांना अचानक आग लागली. वाहनांतील कुशनमुळे आगीने राैद्र रुप धारण केले. आगीचे लोळ व धुराचे लोट उठले होते. आगीची झळ बसल्याने इतरही काही वाहनांचे नुकसान झाले. माहिती मिळताच अग्निशामक दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी आग विझविली. आगीचे कारण समजू शकले नाही.

Web Title: 14 four-wheelers burnt in fire who seized by Pimpri police