१२ वर्षीय मुलीचा विनयभंग ; चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 19:46 IST2019-07-16T19:43:15+5:302019-07-16T19:46:21+5:30
आईसोबत रस्त्याने पायी जात असलेल्या १२ वर्षीय मुलीचा सायकलस्वाराने विनयभंग केला. ही घटना सोमवारी रिव्हर रेसीडेन्सीरोड चिखली येथे रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.

१२ वर्षीय मुलीचा विनयभंग ; चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल
पिंपरी : आईसोबत रस्त्याने पायी जात असलेल्या १२ वर्षीय मुलीचा सायकलस्वाराने विनयभंग केला. ही घटना सोमवारी रिव्हर रेसीडेन्सीरोड चिखली येथे रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.
याप्रकरणी मुलीच्या आईने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रेहान ऐहसानअली सय्यद (रा. रिव्हर रेसीडन्सी, चिखली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या मुलीसोबत फराळाचे सामान घेण्यासाठी दुकानामध्ये गेल्या होत्या. तेथून पुन्हा घरी जात असताना रेहान सय्यद याने पाठीमागून येऊन १२ वर्षीय मुलीचा विनयभंग केला. चिखली पोलीस पुढील तपास करत आहेत.