पिंपरीत १२ वर्षीय मुलाची साडीच्या साह्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 21:40 IST2021-07-15T21:39:48+5:302021-07-15T21:40:09+5:30

बाहेर जातो असे सांगून सुशांत हा गुरुवारी सकाळी घरातून बाहेर पडला होता.

12 year old boy commits suicide in Pimpri | पिंपरीत १२ वर्षीय मुलाची साडीच्या साह्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

पिंपरीत १२ वर्षीय मुलाची साडीच्या साह्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

पिंपरी : बारा वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. पिंपरी येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे गुरुवारी (दि. १५) दुपारी ही घटना उघडकीस आली.  

सुशांत तानाजी सरवदे (वय १२, रा. विठ्ठल नगर, पिंपरी), असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाहेर जातो, असे सांगून सुशांत हा गुरुवारी सकाळी घरातून बाहेर पडला. अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे त्याने साडीच्या साह्याने झाडाला गळफास घेतला. दुपारी साडेबाराच्या सुमारास हा प्रकार काही मुलांच्या निदर्शनास आला. त्यांनी सुशांत यांच्या घरच्यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. सुशांत याला पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

Web Title: 12 year old boy commits suicide in Pimpri