Pune | तरुणीला लग्नातील अडथळे दूर करण्याची पूजा पडली १२ लाखांना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 18:27 IST2022-12-02T18:27:38+5:302022-12-02T18:27:38+5:30
ही घटना सप्टेंबर २०२२ ते एक डिसेंबर २०२२ या कालावधीत चिखली येथे घडली...

Pune | तरुणीला लग्नातील अडथळे दूर करण्याची पूजा पडली १२ लाखांना
पिंपरी : लग्न जमविण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी पूजा-अर्चा करण्याच्या नावे तब्बल १२ लाख १७ हजार रुपये घेऊन तरुणीची फसणूक केली. ही घटना सप्टेंबर २०२२ ते एक डिसेंबर २०२२ या कालावधीत चिखली येथे घडली. या प्रकरणी तरुणीने गुरुवारी (दि.१) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी विशाल शर्मा (रा. जोहारीपूर, उत्तराखंड) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३६ वर्षीय फिर्यादी यांनी आपल्या लग्नाकरिता वधुवर सूचक मंडळामध्ये नाव नोंदवले होते. तेथून अथवा दुसरीकडून आरोपीने फिर्यादीचा नंबर मिळवून संपर्क साधला. लग्न जमविण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी पूजा अर्चा करावी लागेल असे भासवून फिर्यादीकडून वेळोवेळी पैशांची मागणी करून तब्बल १२ लाख १७ हजार १२० चा अपहार केला.