लघुशंकेस थांबलेल्या तरुणास चाकूचा धाक दाखवून १ लाख लुटले; तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 13:44 IST2021-06-29T13:43:25+5:302021-06-29T13:44:09+5:30

बावधन येथे रविवारी रात्री आठच्या सुमारास घटना घडली

1 lakh robbed by stabbing a young man who stopped urinating; Charges were filed against the three | लघुशंकेस थांबलेल्या तरुणास चाकूचा धाक दाखवून १ लाख लुटले; तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल

लघुशंकेस थांबलेल्या तरुणास चाकूचा धाक दाखवून १ लाख लुटले; तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल

ठळक मुद्देसोन्याची चेन, मोबाइल व रोख रक्‍कम असा एकूण एक लाख एक हजारांचा ऐवज चोरून नेला

पिंपरी : लघुशंकेसाठी थांबलेल्या तरुणास मारहाण केली. तसेच चाकूचा धाक दाखवून त्याला लुटले. याप्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. बावधन येथे रविवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली.

वैभव शरद बालवडकर (वय २७, रा. बालेवाडी, पुणे) यांनी सोमवारी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी रिक्षातील तीन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालवडकर हे दुचाकीवरून जात होते. मुंबई -बेंगळुरू महामार्गावरील बावधन येथे आले असता लघुशंकेसाठी ते थांबले. त्यावेळी रिक्षातून आलेल्या तीन चोरट्यांनी बालवडकर चाकूचा धाक दाखवून मारहाण केली. त्यांच्याकडील सोन्याची चेन, मोबाइल व रोख रक्‍कम असा एकूण एक लाख एक हजारांचा ऐवज चोरून नेला. सहायक पोलीस निरीक्षक उद्धव खाडे तपास करीत आहेत.

Web Title: 1 lakh robbed by stabbing a young man who stopped urinating; Charges were filed against the three

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.