डोमिनोज पिझ्झाची शाखा देण्याच्या बहाण्याने एक कोटीची फसवणूक; भोसरीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2023 19:19 IST2023-07-08T19:14:58+5:302023-07-08T19:19:40+5:30

फिर्यादी हे व्यावसायिक आहेत, त्यांना डोमिनोज पिझ्झासाठी शाखा हवी होती...

1 Crore fraud on the pretext of providing branch of Domino's Pizza; Incident in Bhosari | डोमिनोज पिझ्झाची शाखा देण्याच्या बहाण्याने एक कोटीची फसवणूक; भोसरीतील घटना

डोमिनोज पिझ्झाची शाखा देण्याच्या बहाण्याने एक कोटीची फसवणूक; भोसरीतील घटना

पिंपरी : डोमिनोज पिझ्झा या दुकानासाठी शाखा उपलब्ध करून देतो, असे सांगत एकाची एक कोटी रुपयांची फसवणूक केली. ही घटना ९ जून ते ६ जुलै २०२३ या कालावधीत भोसरी येथे घडली. याप्रकरणी विवेक दत्तू राठोड (वय ३५, रा. भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दीपक शर्मा, निपुण मित्तल व प्रकाश सिंग (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे व्यावसायिक आहेत. त्यांना डोमिनोज पिझ्झासाठी शाखा हवी होती. आरोपींनी फिर्यादी यांना शाखा देण्याचे सांगत विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादींकडून १ कोटी ५१ हजार रुपये बँक खात्यावर घेतले. मात्र, त्यानंतर शाखा उपलब्ध करून न देता फिर्यादींची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे.

Web Title: 1 Crore fraud on the pretext of providing branch of Domino's Pizza; Incident in Bhosari