जगातील प्रसिद्ध चहाचे मळे...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2019 08:06 PM2019-02-25T20:06:52+5:302019-02-25T20:16:34+5:30

भारतातील केरळमध्ये ब्रिटिशांनी विकसित केलेल्या हिल स्टेशनसारखेच मुन्नारही एक थंड हवेचे ठिकाण आहे. केरळच्या इडुवकी जिल्ह्यात मुन्नार आहे. मुन्नार येथील टी गार्डन्समध्ये चहाचे उत्पादन पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येतात.

मलेशियातील पहांग राज्यात असलेल्या कॅमरन हायलॅंडमध्ये बोह टी प्लांटेशन आहे. या प्लांटेशनची सुरुवात 1929 मध्ये झाली असून मलेशियातील सर्वात जास्त चहाची निर्मिती येथून केली जाते.

दक्षिण कोरियातील सिओलपासून जवळपास 397 किलोमीटर अंतरावर बोजूंग टी गार्डन आहे. ही सुद्धा जगभरात प्रसिद्ध आहे.

केनियातील किरिचोमध्ये सुद्धा चहाचे मळे लोकप्रिय आहेत.

चीनमधील हुबेई भागात असलेले चहाचे मळे जगभरात प्रसिद्ध आहेत.

याशिवाय, चीनमधील सिचुआय प्लांटेशनमध्ये मोठ्या प्रमाणात चहाची निर्मिती केली जाते.

रवांडाची राजधानी किगालीतील मुलिंदी टी इस्टेट प्रसिद्ध आहे.