Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 17:51 IST2025-09-12T17:47:13+5:302025-09-12T17:51:26+5:30

दुबई हे आपल्या आलिशान जीवनशैली आणि सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. पण येथील कायदेही तितकेच कडक आहेत, याची माहिती असणे महत्त्वाचे आहे.

दुबई हे आपल्या आलिशान जीवनशैली आणि सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. पण येथील कायदेही तितकेच कडक आहेत, याची माहिती असणे महत्त्वाचे आहे. दुबईत एखादी छोटीशी चूकही तुम्हाला अडचणीत आणू शकते आणि थेट तुरुंगातही पाठवू शकते. तुम्ही जर दुबईला फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर खालील गोष्टी लक्षात ठेवा आणि त्या टाळा.

दुबईत सार्वजनिक ठिकाणी गळाभेट घेणे, चुंबन घेणे किंवा जास्त वेळ रोमँटिक मूडमध्ये राहणे कायद्याच्या विरोधात आहे. असे कृत्य केल्यास तुम्हाला थेट तुरुंगात जावे लागू शकते.

लायसन्स असलेल्या क्लब्स किंवा हॉटेल्समध्ये दारू पिणे ठीक आहे, पण दारूच्या नशेत रस्त्यावर फिरताना दिसल्यास मोठ्या अडचणी येऊ शकतात. दुबईत सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्यावर आणि नशेत गैरवर्तन करण्यावर कठोर बंदी आहे.

दुबईत काही ठिकाणी फोटोग्राफीला पूर्णपणे बंदी आहे. विशेषतः सरकारी कार्यालये, पूल, लष्करी क्षेत्र किंवा विमानतळाचे फोटो काढताना पकडले गेल्यास तुम्हाला तुरुंगात जावे लागू शकते.

जर तुम्ही रागाच्या भरात कोणाला शिवीगाळ केली किंवा हाणामारी केली, तर दुबई पोलीस लगेच कारवाई करतील. येथे सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन आणि गैरवर्तन अजिबात सहन केले जात नाही.

दुबईत ड्रग्स आणि गांजासारख्या कोणत्याही अंमली पदार्थांवर पूर्णपणे बंदी आहे. काही औषधेही येथे प्रतिबंधित आहेत. ई-सिगारेटचा चुकीचा वापरही तुम्हाला मोठी शिक्षा देऊ शकतो.

तुम्ही कोणत्याही स्थानिक महिला किंवा कुटुंबाचा फोटो त्यांच्या परवानगीशिवाय काढल्यास, ती एक मोठी चूक मानली जाते. यासाठीही तुम्हाला तुरुंगात जावे लागू शकते.

दुबईत समुद्रकिनारे आणि क्लब्स सोडून इतर सार्वजनिक ठिकाणी जास्त छोटे किंवा अंगप्रदर्शन करणारे कपडे घालणे योग्य मानले जात नाही. त्यामुळे, शॉर्ट्स, डीप नेक किंवा खूप रिव्हिलिंग कपडे घालणे टाळा.