Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 20:34 IST2025-11-13T20:27:43+5:302025-11-13T20:34:10+5:30

आम्ही तुम्हाला अशाच एका देशाबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्ही फक्त १० हजार रुपये घेऊन गेलात, तर तिथे त्याची किंमत तब्बल ३० लाख रुपयांच्या बरोबरीची होते.

दरवर्षी मोठ्या संख्येने भारतीय नागरिक परदेशात फिरायला जातात. मात्र, सहसा परदेशी प्रवास म्हटला की डोळ्यासमोर येतो तो खर्च! त्यामुळे अनेक जण अशा देशांचा शोध घेत असतात, जिथे भारतीय रुपयाचे मोठे वर्चस्व असेल. जर, तुम्हीही अशाच एका बजेट-फ्रेंडली आणि सुंदर ठिकाणाच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी एक जबरदस्त पर्याय आहे!

आम्ही तुम्हाला अशाच एका देशाबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्ही फक्त १० हजार रुपये घेऊन गेलात, तर तिथे त्याची किंमत तब्बल ३० लाख रुपयांच्या बरोबरीची होते. हा देश आहे व्हिएतनाम!

दक्षिण आशियातील हा देश आपल्या निसर्गरम्य आणि ऐतिहासिक सौंदर्यासाठी जगभर ओळखला जातो. व्हिएतनाममध्ये भारतीय रुपयाची किंमत खूप जास्त आहे. १ भारतीय रुपया जवळपास २९६.८५ व्हिएतनामी डोंग आहेत.

या हिशोबाने, जर तुम्ही १०००० रुपये व्हिएतनाममध्ये घेऊन गेलात, तर त्यांची स्थानिक व्हिएतनामी चलनामध्ये किंमत ३० लाखांच्या आसपास होते. हा देश तसा खूपच स्वस्त आहे, पण इथले सुंदर समुद्रकिनारे, ऐतिहासिक नद्या, समृद्ध संस्कृती आणि काही ठिकाणी असलेली लक्झरी पर्यटकांना विशेष आकर्षित करते. यामुळेच दरवर्षी मोठ्या संख्येने परदेशी पर्यटक व्हिएतनामला भेट देतात.

व्हिएतनामला जाण्याचा विचार करत असाल, तर आणखी एक चांगली बातमी म्हणजे विमान तिकीट देखील स्वस्त आहे. तुम्हाला कोलकाता किंवा दिल्लीहून व्हिएतनामसाठी स्वस्त फ्लाईट्स मिळतात. याशिवाय अहमदाबाद, मुंबई किंवा बंगळूरू अशा मोठ्या शहरांतूनही तुम्ही फ्लाईट पकडू शकता.

व्हिएतनामसाठी दोन्ही बाजूच्या फ्लाईटचे तिकीट तुम्हाला अंदाजे २० हजार ते २१ हजार रुपयांच्या आसपास पडू शकते. इतक्या कमी खर्चात दुसऱ्या देशात प्रवासाची सुविधा मिळणे फार दुर्मिळ आहे. तुम्ही इथे जाण्यासाठी 'हो ची मिन्ह' किंवा 'हनोई' या प्रमुख व्हिएतनामी शहरांचे तिकीट बुक करू शकता.

व्हिएतनामला जाण्यासाठी तुम्हाला व्हिसा अर्ज करणे आवश्यक आहे. हा व्हिसा साधारणपणे ३० दिवसांसाठी मिळतो. प्रवासाला निघण्यापूर्वी सुमारे १० दिवस आधी व्हिसासाठी अर्ज करा, जेणेकरून तुम्हाला तो वेळेवर मिळेल आणि प्रवासात कोणतीही अडचण येणार नाही.

तुम्ही व्हिएतनामचा प्रवास करत असाल, तर हनोई, हा लाँग बे, सापा, फोंग न्हा-के बांग नॅशनल पार्क आणि दा नांग यांसारख्या सुंदर आणि ऐतिहासिक ठिकाणांना नक्की भेट द्या. तर, कमी बजेटमध्ये परदेशात भटकंती करण्याची इच्छा असेल, तर व्हिएतनाम तुमच्यासाठी सर्वोत्तम 'बजेट डेस्टिनेशन' ठरू शकते!